Farmer commits suicide sakal
जळगाव

कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातच घेतला गळफास

गावातील नागरिकांकडून मुलाच्या लग्नासाठी पैसे घेतले होते.

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल (जि. जळगाव) : तालुक्यातील पिंपळकोठा येथे सोसायटीचे कर्ज, नातेवाइकांनी काढून दिलेले कर्ज व इतर हात उसनवारीचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत, तसेच सतत पावसामुळे शेतीमध्ये होणारे नुकसान पाहून राजू सुकलाल मराठे या ५३ वर्षीय शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

राजू सुकलाल मराठे (रा. पिंपळकोठा, ता. एरंडोल) शेतकरी आपल्या परिवारासह शेतीकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. शेती करण्यासाठी मुलाने सोसायटीचे कर्ज काढले आहे. जे गेल्या तीन वर्षांपासून भरले नाही. नातेवाइकांनीही सोसायटीचे कर्ज काढून दिले आहे, तसेच गावातील नागरिकांकडून मुलाच्या लग्नासाठी पैसे घेतले आहेत, ते कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत गेल्या काही दिवसांपासून राहत होते.

तसेच सध्या संततधार पावसामुळे शेतात पिकांपेक्षा तण जास्त मोठे झाले होते. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास शेतकरी राजू मराठे शेतात गेले. त्यांनी शेतात असलेल्या निंबाच्या झाडास नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी आठपासून राजू मराठे घरी आले नाही, म्हणून पत्नी सरलाबाई मराठे यांनी पुतण्या महेंद्र मराठे यास सांगितले, की काका सकाळी आठपासून शेतात गेले आहेत, अजून परत आले नाहीत. त्यामुळे महेंद्र मराठे, राजू माणिक मराठे, राजू बाळू मराठे हे तिघे दुचाकीने शेतात गेले असता, त्या ठिकाणी राजू मराठे यांनी आत्महत्या केल्याचे दिसले.

महेंद्र मराठे व सोबत असलेल्या दोघांनी राजू मराठे यांना खाली उतरून ट्रॅक्टरवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात आणले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत महेंद्र रामदास मराठे यांनी दिलेल्या माहितीवरून एरंडोल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील तपास करीत आहेत. मृत राजू मराठे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT