Ganapur (T. Chopra) : Bonde rotted due to the infestation of bollworm in fardar crop esakal
जळगाव

Jalgaon News : फरदडची आशा धूसर; बोंडअळी दणकली

सकाळ वृत्तसेवा

गणपूर : चोपडा तालुक्यात बऱ्याच शिवारात गेल्या महिन्यापर्यंत कापसाला असलेल्या चांगल्या भावामुळे कपाशीचे फरदडचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर दिसत होते. मात्र, बोंडअळीने डोके वर काढल्याने हे पीक आता काढून त्यावर दुसऱ्या पिकाची पेरणी होताना दिसत आहे.

कापसाचे बाजार पंधरवड्यापूर्वी नऊ हजार चारशे रुपयांपर्यंत पोचले होते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशीचे फरदडचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, बोंडअळी दिसू लागल्याने या पिकापासून उत्पन्नाची आशा मावळू लागली आहे. (Infestation of bollworm in fardar crop Jalgaon News pvc99)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

शिवाय वेचणीची मजुरीही जास्त लागणार असल्याने हे पीक उपटून मका, गहू, बाजरी, भुईमूग आदी पिकांची पेरणी त्या क्षेत्रावर होताना दिसत आहे.

या वर्षी पावसाळ्यात कपाशीच्या पिकात बोंडअळी दिसून आली नाही. मात्र, डिसेंबरमध्ये फवारणीकडे कानाडोळा होताच बोंडअळी वाढल्याने खानदेशात फरदडचे क्षेत्र घटण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT