armyworm esakal
जळगाव

Jalgaon News : हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव; वावडेसह परिसरातील शेतकरी संकटात

सकाळ वृत्तसेवा

वावडे (जि. जळगाव) : परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावर पाने खाणाऱ्या हिरव्या घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला असून, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक कीटकनाशकांची फवारे करूनही ओळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. (Infestation of ghat armyworm on gram crop Farmers in area including Vawde in trouble Jalgaon News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

वावडेसह परिसरात यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्याने पेरणी लावलीनंतर जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. त्यातून सावरलेल्या शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले. आता ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुसरीकडे अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर रोगराईचा परिणाम झाला आहे. त्यामुळे
उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे. आता हे कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हरभरा पीक धोक्यात आले असून, यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. उरली सुरली पिके परतीच्या पावसाने वाया गेली. अशा स्थितीत शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून असून, वातावरणातील बदलांचा फटका रब्बी हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढला असला तरी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : पायाभूत प्रकल्प तातडीने मार्गी लावा - मुख्यमंत्री

Raj Thackeray Angry Reaction: ‘’निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद पाहून, तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता...’’

Leopard Conflict : मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी चार तासांत ११.२५ कोटींचा निधी मंजूर!

माझ्या माघारी मुलाला कोण सांभाळेल... मराठी अभिनेत्रीने सांगितला घटस्फोटाचा काळ; म्हणाली, 'रात्रभर झोप... '

SCROLL FOR NEXT