Death News esakal
जळगाव

Jalgaon News : डोळ्यादेखत आईला गमावणाऱ्या अपघातील जखमी तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (ता. ३) दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात मुलाच्या दुचाकीवर बसलेली आई अंगावरून ट्रक गेल्याने जागीच ठार झाली होती. त्यांचा गंभीर जखमी मुलगा कामील याचा बुधवारी (ता. ४) उपचारादरम्यान मृत्यू झाला. (injured youth who lost his mother also died during treatment Jalgaon News)

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

समतानगरनगरमधील रहिवासी अल्ताफ बेग यांच्या पत्नी जुबेदाबी मुलगा कामील बेग (वय २०) सावदा येथून साखरपुडा आटोपून दुचाकी (एमएच १९, डीएक्स ८१५८)वरून जळगावला येत असताना, नशिराबादजवळ समोरून येणाऱ्या दुचाकी (एमपी ०९, एमझेड ७६३७) स्वाराने कामील बेग याच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार खाली फेकले गेले, तर कामीलची आई जुबेदाबी यांच्या अंगावरून सुसाट ट्रक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. गंभीर जखमी कामील बेग याच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. तेथे उपचार सुरू असताना, बुधवारी सायंकाळी कामील बेग याची प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती मिळताच कुटुंब व नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली. रात्री आठला कामील बेग याचा मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात आणला असून, सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांना सोपवला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT