MLA Suresh Bhole felicitated Deputy Chief Minister Devendra Fadnavis by giving a bouquet on Tuesday for solving the problem of the scumbag holders. esakal
जळगाव

Jalgaon News : मनपा संकुलातील गाळेधारकांचा भाडे नुतनीकरणाचा मार्ग मोकळा; कॅबिनेटमध्ये निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिकेच्या व्यापारी संकुलातील तब्बल २ हजार ३६८ गाळेधारकांच्या भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत होता. मंगळवारी (ता. १०) राज्य मंत्रीमंडळाच्या कॅबीनेट बैठकीत त्यावर निर्णय होवून हा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

गाळ्याच्या जुन्या भाडेपट्ट्याच्या दुप्पट भाडे घेण्यास मंजूरी देण्यात आली आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक आकारणी करू नये असाही निर्णय झाला आहे. आपण केलेल्या प्रयत्नाला यश आल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. (It was sanctioned to take double rent of the old lease of shop jalgaon news)

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्‍नाबाबत अनेक वेळा बैठकाही झाल्या. गाळेधारकांनी आपला प्रश्‍न सुटल्याशिवाय भाडे भरण्यास नकार दिला होता. त्यामुळे महापालिकेचेही आर्थिक नुकसान होत होते. याबाबत आमदार भोळे यांनीही शासनाकडे पाठपुरावा सुरूच ठेवला होता.

राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जळगावातील गाळेधारकांच्या प्रश्‍नावर या वेळी चर्चा केली. या वेळी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे जळगावसह राज्यभरातील महापालिका, पालिका संकुलातील गाळेधारकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, दर निश्‍चितीसाठी मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील ‘भाडे आणि सुरक्षा ठेव निर्धारण समिती’द्वारे गाळ्यांची भाडेपट्टी निश्‍चित करावी, असे या वेळी सांगण्यात आले. गाळेधारकांचा प्रश्‍न सुटल्याने महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.

"राज्य मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय गाळेधारकांच्या हिताचा आहे. गेल्या अनेक वर्षांचा प्रश्‍न सुटला आहे. त्यामुळे भाडेपट्टा हस्तातंरण नूतीनकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे." -सुरेश भोळे, आमदार, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT