Minister Gulabrao Patil while inaugurating government sand depot in Tapi riverbed at Nanded in Dharangaon taluka. esakal
जळगाव

Jalgaon News : शासकीय डेपोतून 1 लाख ब्रास वाळू उपलब्ध होणार; 600 रुपये दर

Jalgaon : जिल्ह्यात २२ डेपोंमधून १ लाख ब्रासपेक्षा अधिक वाळू उपलब्ध होईल. त्याअंतर्गत नांदेड येथे डेपोचे उद्‌घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : वाळू बांधकामासाठी लागणारी अत्यावश्यक गोष्ट असल्यामुळे त्यात अनेक गैरप्रकार घडत. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले होते म्हणून आता शासकीय डेपोतून ६०० रुपये दराने वाळू उपलब्ध होणार आहेत.

जिल्ह्यात २२ डेपोंमधून १ लाख ब्रासपेक्षा अधिक वाळू उपलब्ध होईल. त्याअंतर्गत नांदेड येथे डेपोचे उद्‌घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.

तापी नदी पात्रातील नांदेड येथील शासकीय वाळू डेपोचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे.

जिल्हा खानिकर्म अधिकारी रविंद्र उगले, प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड, तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार सातपुते, गटनेते पप्पू भावे आदीसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

श्री पाटील म्हणाले की, राज्य सरकारने १६ फेब्रूवारी २०२४ ला ६०० रुपयात प्रती ब्रास वाळू देण्याचे नवे धोरण जाहीर केले. यानुसार प्रशासनाने घरकुलासाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे. राज्यात वाळू अभावी घरकुलाची काम राज्यात मोठ्या प्रमाणात रखडली. अवैध वाळू विक्रीमुळे दरही वाढले होते.

घरकुलासाठी मंजूर रकमेत घरकुल लाभार्थ्यांना घर बांधणे अवघड बनले होते. अवैध वाळू उत्खनातून अवैध वाळू विक्री वाढली होती‌. नव्या वाळू धोरणामुळे सर्वांना सहज, वाजवी दरात वाळू उपलब्ध होउन शासनाला महसूल मिळणार आहे.

घरकुल धारकांना मोफत वाळू

शासनाच्या दलित, आदिवासीच्या घरासाठी ‘घरकुल धारकांना मोफत वाळू’ देण्याच्या क्रांतिकारी निर्णयामुळे रमाई घरकूल, शबरी घरकुल व अन्य घरकूल योजनांद्वारे घरांची बांधकामे करण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाळुची उपलब्धता आहे किंवा नाही याची माहिती घेत नियोजनाच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

अशी असेल उपलब्धता

नांदेड येथील गट नंबर १११९ मध्ये वाळू गट क्र. १२ व १३ साठी ५२४७ ब्रास वाळूसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात २९ वाळू गटांसाठी २२ वाळू डेपो स्थापन होणार असून त्यातून १ लक्ष ०६ हजार ७९७ ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे. ना नफा - ना तोटा या तत्वानुसार ग्राहकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

नोंदणी केल्यावर १५ दिवसांच्या आत वाळू डेपो मधून वाळू घेऊन जाणे बंधनकारक असणार आहे. यावेळी तालुक्यातील अनिता सैदाणे, अनिता बावस्कर यांचा साळी चोळी व बुके देवून तसेच व दिलीप केदार यांचा रुमाल व टोपी देवून सत्कार झाला. घरकुल धारकांना प्रत्येकी ५ ब्रास रेतीचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT