Heatstroke esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यात ७७ उष्माघात कक्ष; आरोग्य विभागाची दक्षता

Jalgaon : जिल्ह्यात तापमान ४२ अंशावर गेले आहे. उष्णतेची लाट जाणवत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात तापमान ४२ अंशावर गेले आहे. उष्णतेची लाट जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उष्माघात होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू केला आहे. जिल्हाभरात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उष्णतेची लाट जाणवत आहे. त्याच पार्श्वभूमिवर जिल्हा परिषेदेचे सीईओ अंकित यांनी आरोग्य विभागाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहे. (Jalgaon 77 heat stroke room in district)

त्यानुसार आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केले असून यात ६ खाटा आरक्षित केल्या आहेत. उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्यासाठी उपाययोजना असावी, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात सज्जता ठेवली आहे.

ही आहेत उष्माघात होण्याची कारणे

* उन्हामध्ये शारीरिक श्रमाची कामे जास्त वेळ करणे

* कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे

* काच कारखान्यातील काम करणे

* जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे

* घट्ट कपड्यांचा वापर करणे

* उष्णतेशी सतत संबंध येणे (latest marathi news)

असे आहेत प्रतिबंधात्मक उपाय..

* कमी तापमान असताना कामे करावीत

* सैल, उष्णतापरावर्तित करणारे पांढरे कपडे वापरावेत

* पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे

* उन्हामध्ये काम करणे टाळावे

* सावलीत विश्रांती घ्यावी

* शक्यतो उन्हात फिरण्याचे टाळावे

* उन्हात जाताना रिकाम्या पोटी जाऊ नये

* कान व डोक्याचा उन्हापासून बचाव करावा

*डोक्याभोवती पांढरा रुमाल गुंडाळावा

* गॉगल व हेल्मेट वापरावे

* वृद्धांना, बालकांना उन्हात फिरू देऊ नये.

उष्माघाताची लक्षणे व उपचार

लक्षणे : निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन, अस्वस्थ, बेशुद्ध अवस्था इत्यादी, उलटी होणे, शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, थकवा येणे, ताप येणे (१०२ पेक्षा जास्त) त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे.

उपचार : उष्माघात झालेल्या रुग्णास हवेशीर खोलीत ठेवणे. खोलीत पंखे, कुलर ठेवावेत. रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रोग्याला बर्फाच्या पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. आईसपॅक लावावेत, ओआरएस सोल्यूशन द्यावे.

"वाढत्या तापमानाच्या वेळेत कष्टाची कामे टाळणे, कष्टाची कामे सकाळी लवकर वा संध्याकाळी उन्हाळ्यामुळे उष्माघाताचे रुग्णावर उपाययोजना करण्यासाठी व मृत्यू टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आवश्यक ती सर्व तयारी ठेवणेबाबत आदेश दिले आहेत. हवेशीर खोली, पुरेसा औषधी, सलाईनचा साठा, खोलीत पंखे, कुलर सुविधा केली आहे."- डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT