Jalgaon Market Committee election esakal
जळगाव

Market Committee News : ‘महाविकास’ मध्ये नॉट आलबेल, ‘भाजप’ ची तिरकी चाल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचा सभापती व उपसभापती झाला. मात्र, या वेळी झालेल्या वादामुळे महाविकास आघाडीत सर्व काही ‘आलबेल’ नसल्याचे चित्र दिसून आले.

"तर महाविकास आघाडीच्या वादात भाजपने उडी घेवून आपल्या सर्व संचालकांची मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पदरात टाकली.भाजपच्या या तिरक्या चालीमुळे भविष्यातील राजकारणाचा बुद्धीबळाचा नवीन पट मांडण्याची खेळी दिसू लागली आहे."

( Jalgaon Agricultural Produce Market Committee Election Update BJP Congress Mva Jalgaon News)

- कैलास शिंदे

जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर अगोदर भाजप-शिंदे गटाचा झेंडा होता.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ताब्यात ही समिती होती. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडी विरूद्ध भाजप-शिंदे गट पॅनल अशी निवडणूक झाली.

यात महाविकास आघाडीच्या पॅनलला अकरा, तर भाजप-शिंदे गटाला केवळ सहा जागा मिळाल्या. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला.

अपक्षानेही महाविकास आघाडीला पाठींबा दिल्यामुळे महाविकास आघाडीचे बहुमत निश्‍चित झाले होते. भाजप-शिंदे गटाकडून ही बाजार समिती निसटल्याचे स्पष्ट चित्र दिसत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महाविकास आघाडीचे नेतृत्व गुलाबराव देवकर हे करीत आहेत. सभापती निवडीचा मात्र मोठा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर, श्‍यामकांत सोनवणे व सुनील महाजन या पदासाठी इच्छुक होते.

आघाडीतर्फे त्यांचे नाव निश्‍चीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अगदी अंतीम वेळेपर्यंत आघाडीतर्फे नावाची घोषणा झाली नाही. त्यामुळे निवडीच्या वेळेस उमेदवारीचा घोळ झाल्याचे चित्र दिसून आले.

प्रत्येकाला एक वर्ष संधी देण्याचे ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पहिल्या वर्षी आपल्यालाच पद मिळावे यासाठी श्‍यामकांत सोनवणे व लक्ष्मण पाटील यांच्यात चुरस झाली. दोघांनी अर्ज दाखल करावे, त्यानंतर ठरवू व एकाने माघार घ्यावी असे ठरल्याचे आघाडीचे नेते श्री. देवकर यांनी सांगितले.

परंतु, अर्ज भरण्यापासूनच वाद सुरू झाला. आपल्याला अर्जच भरू दिला जात नसल्याची तक्रार पाटील यांनी केली. तर सोनवणे यांनी हे सर्व आरोप नाकारताना, आपली उमेदवारी देवकरांनी निश्‍चित केल्याने आपण अर्ज भरल्याचे सांगितले. हा वाद अधिकच वाढला आणि प्रकरण हातघाईवरही आले, आरोप प्रत्यारोप झाले.

महाविकासच्या दोघांची उमेवारी कायम राहिली. त्यावर मतदान झाले अन्‌ सोनवणे विजयी झाले. लक्ष्मण पाटील व त्यांचे पुत्र संदीप पाटील यांनी मतदान केले नाही. पाटील यांनी या निवडीवर नाराजी व्यक्त केली.

या निवडीनंतर गुलाबराव देवकर यांनी दोघांच्या सलोख्याचे प्रयत्न केले. लक्ष्मण पाटील यांनी सोनवणे यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रकरण मिटल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या सर्व वादात बाजार समितीत महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे.

दुसरीकडे या सर्व वादात भाजपने वेगळीच खेळी केली. त्यांनी सभापतीपदासाठी दाखल केलेला प्रभाकर सोनवणेंचा अर्ज मागे घेतला.

त्यानंतर झालेल्या मतदानात आपल्या पक्षाच्या संचालकांची चारही मते थेट महाविकास आघाडीचे उमेदवार श्‍यामकांत सोनवणे यांना दिली. भाजपच्या या खेळीने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.

बुद्धीबळाच्या पटलावरील उंटाची तिरकी चाल अचानक खेळून भाजपने साधलेले गणित मात्र आगामी राजकारणाच्या नव्या दिशेची चुणूक दाखवत आहे. मात्र, याचे कोडे उलगडण्यासाठी आगामी निवडणूकांची वाट पहावी लागणार, हे निश्‍चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: यूपीआय पेमेंटला 'चार्ज' लागणार का? केंद्र सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण; मोठ्या व्यापाऱ्यांसाठी वेगळा नियम

संसदेत बाजी पलटणार? मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भाजपला मिळाली जुन्या मित्र पक्षाची साथ, मोठ्या पक्षाचा NDA ला पाठिंबा

Latest Marathi News Live Update : पुन्हा एकदा पुणेरी बॅनर चर्चेत... आगळ्या -वेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, बैठकांना सुरुवात; 'हे' 5 मुद्दे गाजणार

रेल्वे पुनर्वसन प्रकल्पासाठी जागा मोकळी करणे आवश्यक; गणेश नगर-मेघवाडी कारवाईवर DRP चं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT