Jalgaon Agriculture News esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : शेतीच्या मशागतीला ‘अवजार बँके’चा बूस्टर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘शेतकरी संवेदना’ अभियानांतर्गत जळगाव तालुक्यातील धानवड येथील अल्पभूधारक गरीब गरजू व आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारातील शेतकऱ्यांच्या सेवेत मोफत अवजार बँक रुजू करण्यात आली आहे.

भरारी फाउंडेशनच्या पुढाकारातून कृषी विभाग, ममुराबादचे कृषी विज्ञान केंद्र व पद्मालय फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

‘बीबीएफ’ उपकरणाचे प्रात्यक्षिक

यात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे म्हणून बीबीएफ उपकरण मोफत वापरण्यासाठी प्रदान करण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता. २) या उपकरणाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. त्याचसोबत रोटावेटर व जे शेतकरी शेताच्या पिकांमधील तण काढण्यासाठी मजूर लावू शकत नाही त्यांना मोफत तण काढण्यासाठी पावर वीडर देण्यात येणार आहे.

हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

४५ शेतकऱ्यांना लाभ

यात धानवड गावातील ४५ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, १०० एकरच्या वर जमिनीची पेरणी व मशागतीसाठी ‘भरारी’ची अवजार बँक मोफत उपलब्ध करून देण्यात आली. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी भरारी फाउंडेशन सात वर्षांपासून प्रयत्न करीत असून, त्यामध्ये या उपक्रमाची भर झाली आहे.

...यांचे मिळतेय सहकार्य

या उपक्रमासाठी भालचंद्र पाटील, पुखराज पगारिया, रजनीकांत कोठारी, अनिल भोकरे, रवींद्र लढ्ढा, ॲड. किशोर पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, सपन झुनझुनवाला, भगवान पाटील यांचे सहकार्य मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT