Anil Patil esakal
जळगाव

Anil Patil News : अमळनेर मतदारसंघातील प्रवास होणार सुखकर; हायब्रीड ॲम्युनिटीअंतर्गत 2 मोठ्या रस्त्यांना मंजुरी

Jalgaon : अमळनेर मतदारसंघात ३१२ कोटी रुपयांच्या दोन मोठ्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आल्यामुळे नागरीकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अमळनेर मतदारसंघात ३१२ कोटी रुपयांच्या दोन मोठ्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आल्यामुळे नागरीकांचा प्रवास सुखकर होणार आहे. मंत्री अनिल पाटील यांनी महत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावला असून, हायब्रीड ॲम्युनिटीअंतर्गत काम होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जळगाव अंतर्गत हायब्रीड ॲम्युनिटी भाग २ अंतर्गत अमळनेर मतदारसंघात ५७ किलोमीटरच्या दोन मोठ्या रस्त्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली. (Jalgaon Amalner Constituency 2 major roads worth Rs 312 crore have been approved)

यात पारोळा, अमळनेर ते जळोद आणि जानवे - बहादरपूर - पारोळा या रस्त्यांचा समावेश आहे. सदरचे रस्ते नव्या धोरणानुसार ट्रीमिक्स काँक्रीटीकरणचे होणार असल्याने अनेक वर्षांसाठी हे रस्ते वरदान ठरणार आहेत. विशेष म्हणजे परिसरातील दोन राज्य, अनेक तालुके व अनेक गावांना रस्ते जोडणार आहेत.

जळोद ते अमळनेर-पारोळा २०६ कोटींचा रस्ता आमलाड- मोड- बोरद- तऱ्हाडी- शहादा- सांगवी- हातेड- अमळनेर- पारोळा रस्ता राज्य मार्ग क्रमांक १ ची रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी ३२.६३० किमीच्या रस्त्यासाठी २०६.३२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

या राज्य मार्गावर पारोळा ते अमळनेर आणि अमळनेर ते जळोद या दरम्यान काँक्रीटीकरण होणार आहे. विशेष म्हणजे २ पदरी रस्ता होणार असून, यात रस्त्याची रुंदी वाढून जुने पूल नवीन व मोठे होणार आहेत. सदर रस्ता महाराष्ट्रातील चोपडा व शिरपूर या तालुक्यांना पर्यायी मार्ग तसेच मध्यप्रदेश महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. (latest marathi news)

१०६ कोटींचा जानवे-बहादरपूर-पारोळा रस्ता वावडे, जानवे, बहादरपूर, पारोळा, कासोदा रोड प्राजीमा ४६ या मार्गावर जानवे ते बहादरपूर-पारोळा दरम्यान कॉंक्रीटीकरणासाठी १०६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर असणार आहे.

एकप्रकारे शॉर्टकट् असलेल्या या मार्गाला नवे रूप व नवी झळाळी मिळाली आहे. जानवे, कावपिंप्री, सुमठाणे, इंधवे, जीराळी, बहादरपूर, महाळपूर, शेवगे, बोदर्ड, पारोळा या गावांमधून जाणारा हा रस्ता ग्रामीण जनतेसाठी वरदान ठरणार आहे.

"अमळनेर मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून रस्त्यांची कामे होत आहे. मात्र, नौटंकी करणाऱ्यांच्या पोटात दुखत असल्याने ते नेहमीच कोणत्याना कोणत्या मार्गाने मंत्री महोदयांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहे." - भागवत पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT