Pramod Dhangar, Dr. Tushar Patil, along with winning contestants in Ladies Run organized by Bhusawal Sports and Runners Association. esakal
जळगाव

Jalgaon News : लेडीज रन मध्ये 10 किलोमीटर गटात अश्विनी मोरे प्रथम

Jalgaon : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे झालेल्या 'बिसारा लेडीज इक्वॅलिटी रन' मध्ये दहा किलोमीटर गटात जळगावच्या अश्विनी मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे झालेल्या 'बिसारा लेडीज इक्वॅलिटी रन' मध्ये दहा किलोमीटर गटात जळगावच्या अश्विनी मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विविध गटात एकुण ४७५ महिला सहभागी झालेल्या स्पर्धेत डॉक्टर, वकील, शिक्षिका, कामगार व गृहिणी अशा सर्वच क्षेत्रातील महिला एकत्र धावल्या.

अश्विनी मोरे यांनी ४६ मिनिटे व आठ सेकंद एवढ्या वेळेत दहा किलोमीटर अंतर पूर्ण केले. (Jalgaon Ashwini More first in 10 km category in ladies run)

स्पर्धेतील इतर विजेत्यांना दहा किलोमीटर गटात वैशाली कोळी यांनी द्वितीय तर सीमा पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर पाच किलोमीटर गटात जान्हवी रोझोदे यांनी प्रथम, उज्वला बारी-द्वितीय व रिधिमा चौधरी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सहभागी स्पर्धकांचा लकी ड्रॉ काढण्यात आला त्यात भारती चव्हाण व प्रतिभा कोकांदे या विजेत्या ठरल्या.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे आयोजन व नियोजनाची बहुतेक जबाबदारी महिलाच पार पाडतात. जळगाव, बुलडाणा, पुणे, नाशिक व अमरावती येथील महिलांनी देखील सहभाग नोंदविला. सुरवातीस कौस्तुभ मंत्री यांनी वॉर्म अप घेतला.

रनच्या सदिच्छादूत डॉ. रती महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरवात केली. माय फिटनेस जिम व हॉटेल मल्हारच्या संचालिक किर्ती धनगर, डॉ तुषार पाटील, उमेश घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. पाच किमी व दहा किमीचा रन हा आरएफआयडी प्रणालीद्वारे टाईम रन नोंदविला जात होता.

स्वयंसेवकांतर्फे धावणाऱ्या महिलांवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. त्यामुळे गुलाबी रंगाचे टी-शर्ट परिधान केलेल्या या महिलांना जणू जयपूरमध्ये धावण्याचा अनुभूती येत होती. (latest marathi news)

रनसाठी अष्टभुजा देवी मंदिराजवळ राधाकृष्ण प्रभातफेरी परिवार, बंब कॉलनी या ठिकाणी पर्यावरण जागरण मंच, कल्पना रसवंतीजवळ लायन्स क्लब इत्यादी स्वयंसेवी संस्थांनी धावपटू महिलांचा उत्साह वाढवला. क्रीडांगणावर परतल्यावर कौस्तुभ मंत्री यांनी स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेतली.

पारितोषिक वितरणाला व्यासपीठावर बढे कॅपिटल्सचे संचालक ज्ञानेश्वर बढे, माय फिटनेस जिमचे संचालक प्रमोद धनगर, संजय कुकरेजा, डॉ तुषार पाटील, डॉ. रती महाजन उपस्थित होते. डॉ. निलिमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील यांनी स्वागत केले. प्रवीण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रूट सपोर्टसाठी प्रवीण फालक व ब्रिजेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्वयंसेवकांनी चोख भूमिका बजावली.

"भुसावळला 'बिसारा लेडीज इक्वॅलिटी' रनने महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल जाणीव करून दिली व या निमित्ताने मोठ्या प्रमाणात महिला सहभाग बघून खरोखरच महिलांमध्ये जागरूकता होत आहे ही खरंच खूप कौतुकास्पद बाब आहे."- डॉ रती महाजन 'सदिच्छा दूत', त्वचाविकार तज्ज्ञ, जळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जमीन-जागा विक्रीतील थांबणार फसवणूक! प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याने काढावा ‘सर्च रिपोर्ट’; बॅंक कर्जाचा बोजा असलेली प्रॉपर्टी विकता येत नाही, वाचा...

दुर्दैवी योगायोग! 'चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू'; वीस दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू अन्..

Panchang 17 November 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या ‘E-kyc’ला निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ? उद्या संपणार 2 महिन्यांची मुदत; 1 कोटींवर महिलांनी अजूनही केली नाही ‘ई-केवायसी’

Liquid Gold For Winters: हिवाळ्यात राहाल निरोगी, सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

SCROLL FOR NEXT