A hut built for living in forest.
A hut built for living in forest. esakal
जळगाव

Satpura Jungle : सातपुड्यात आग लागते की लावली जाते? जंगलातील आयुर्वेदिक वृक्षसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर

अमोल महाजन

धानोरा : सातपुडा पर्वत रांगांमध्ये डिसेंबर ते मार्च महिन्यात जोरदार वणवा पेटतो. दुरूनच आगीच्या उजेडामुळे सातपुडा पर्वत भयावह दिसतो. पर्वतात मध्य प्रदेशातील बरेचसे लोक बेकायदेशीर घरे बांधून राहतात आणि सर्रास वृक्ष तोडतात. हे लोक शेती करण्याच्या हेतूने मुद्दामपणे जाणीवपूर्वक आग लावतात. अनेकवेळा पुराव्यासह याविषयी माहिती समोर येऊनही वन विभागाचे प्रशासन त्याचा काहीच बंदोबस्त करीत नसल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (Jalgaon Ayurvedic tree wealth in Satpura forest is on verge of destruction)

तर काही लोक हेतूपुरस्सर जंगलात आग लावून मोठमोठी झाडे पाडतात. ते पूर्णपणे वाळल्यावर जवळील गावांमध्ये त्या लाकडांची विक्री करताना दिसून येत असतात. या गोष्टींकडे वन अधिकारी व कर्मचारी निमूटपणे पाहत राहून दुर्लक्ष करतात. त्यामुळे सातपुड्यात आग लागते की लावली जाते, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे. वन विभाग व जंगलतोड करणाऱ्यांमध्ये काही साटेलोटे तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

काही लोक पावसाळ्यात उगवलेले गवत उन्हाळ्यात सुकून गेल्याने याठिकाणी जंगलात जाण्यासाठी असलेल्या पायवाटा मोकळ्या करण्यासाठी आगी लावून देत असल्याचे वनप्रेमींचे म्हणणे आहे. सातपुड्याच्या जंगलात मोठ्या प्रमाणात खाण्याचा डिंक उपलब्ध होतो. डिंक गोळा करण्यासाठी जाणारे याठिकाणी सायंकाळी आग लावातात.

त्यामुळे सकाळी डिंक जास्त प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे समजते. अशा अनेक कारणांमुळे सातपुडा पर्वत नामशेष होणार असल्याची भीती वनप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

राजकीय दबावापुढे वनाधिकारी हतबल

सातपुड्यात परराज्यातील लोकांनी येऊन जंगलातील नवाळ काढून शेती तयार करून याठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. मात्र, वनाधिकारी राजकीय दबावापुढे अतिक्रमित लोकांवर काही कारवाई करीत नाहीत. राजकीय पदाधिकारी आपल्या मते मिळण्यासाठी परराज्यातील अतिक्रमित झालेल्या लोकांना प्रोत्साहन देत असल्याचे बोलले जात आहे. (latest marathi news)

धावडी वृक्ष नामशेष होणार

सातपुडा पर्वताच्या रावेर, यावल, चोपडा या भागात धावडी वृक्षापासून डिंक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असते. शासनाने सातपुड्याच्या परिसरातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, म्हणून जंगलात डिंक गोळा करण्यासाठी मुभा दिली आहे. मात्र, काही लोक डिंकाचे उत्पादन जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी धावडी वृक्षाला डिंक निघण्यासाठी असणारे इंजेक्शनचा अतिरेकी वापर करतात.

यामुळे या वृक्षाला धोका निर्माण झाला असून, अतिप्रमाणात दिलेल्या इंजेक्शनने झाडाला इजा होऊन ते नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धावडी वृक्षावरोबरच कालाई, कड, कादबधा या झाडांनाही इंजेक्शन देऊन डिंक मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे सातपुडा पर्वतातून या झाडांचे अस्तित्व कायमचे नष्ट होणार आहे. वन विभागाने अतिरेक होत असलेल्या इंजेक्शनवर अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी वनप्रेमींकडून केली जात आहे.

सातपुडा पर्वतात वृक्षतोडीची धारदार कुऱ्हाड चालविणाऱ्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हिवाळ्यात सातपुडा पर्वतामधील जंगलात अज्ञातांकडून आग लावून सर्रास वृक्षतोड होते. अद्याप वणव्याचे कारण स्पष्ट होत नसल्याने जंगलात आग लागते कशी, हा मोठा प्रश्न वनप्रेमींना पडला आहे. राज्य शासनाचा वन विभाग जंगलात जाऊन गस्त घालत असतानाही आग लागणे नित्याचीच बाब झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT