Critically Endangered Indian vulture and red-headed vulture on the same tree. esakal
जळगाव

Jalgaon News: लाल डोक्याच्या गिधाडासह अनेक दुर्मिळ प्रजाती; वन्यजीव अभ्यासकांकडून बांधवगड टायगर रिझर्वमध्ये निरीक्षण

Jalgaon : वन्यजीव अभ्यासक हेमराज पाटील यांची मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील बांधवगड नॅशनल पार्क व टायगर रिझर्व येथे राष्ट्रीय पक्षी सर्वेक्षण व संशोधन प्रकल्पात निवड झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चोपडा येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक तसेच पक्षी व वन्यजीव अभ्यासक हेमराज पाटील यांची मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील बांधवगड नॅशनल पार्क व टायगर रिझर्व येथे राष्ट्रीय पक्षी सर्वेक्षण व संशोधन प्रकल्पात निवड झाली होती. त्यात त्यांना इमेराल्ड डव, ब्लॅक बेलीड टर्न, बीटर्न, विविध घुबड व गरुड प्रजाती, इजिप्शियन गिधाड, भारतीय गिधाड, किंग व्हल्चर अर्थात लाल डोक्याचे गिधाड या पक्षी प्रजातींबरोबरच पट्टेरी वाघ, हत्ती, अस्वल, नीलगाय, चितळ, लंगूर व अनेक सरीसृप प्रजाती आढळून आल्या. ( Bandhavgarh National Park and Tiger Reserve in district were selected for National Bird Survey and Research Project )

भारतातील स्थानिक स्थलांतरित व निवासी पक्ष्यांचे सर्वेक्षण, डेटा कलेक्शन, छायाचित्रीकरण व शास्त्रीय नोंदी संकलित करण्यासाठी हा चारदिवसीय निवासी कॅम्प बांधवगड टायगर रिझर्व ऑथॉरिटीकडून आयोजित करण्यात आला होता. त्यात देशभरातील विविध राज्यांतील ६५ पेक्षा जास्त पक्षी अभ्यासक व संशोधकांची निवड करण्यात आली होती. या सर्वेक्षण कॅम्प दरम्यान सर्व सहभागी अभ्यासकांकडून जंगलाच्या नऊ वनपरिक्षेत्रात १९८ पक्षी प्रजातींची सचित्र शास्त्रीय नोंदणी व सूची बनविण्यात आली.

हेमराज पाटील यांनी ७९ पक्षी प्रजातींचा डेटा उपलब्ध करून दिला. सुवर्ण वाळू असलेल्या सोन नदी किनारी त्यांनी तीन गिधाड्यांच्या प्रजातींची छायाचित्रासह नोंद केली. या उपलब्ध माहितीद्वारे विविध पक्षी प्रजातींचे विवरण, एकूण संख्या, स्थलांतर मार्ग, जीवन चक्रातील घडामोडी इत्यादी विषयी माहिती संशोधन कार्यासाठी उपयोगात घेण्यात येणार आहे. (latest marathi news)

मध्य भारतातील तीव्र ४८ डिग्री तापमान स्थितीत पक्षी अभ्यासकांनी दररोज २५ ते ३० किलोमीटर पायी भटकंती करून पक्षी सर्वेक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. याबद्दल बांधवगड टायगर रिझर्वचे उपप्रबंधक प्रकाश वर्मा यांनी सहभागींचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन व आभार व्यक्त केले.

बांधवगड विषयी

या जगप्रसिद्ध व्याघ्र राखीव प्रकल्पाची १९६८ मध्ये बांधवगड राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषणा करण्यात आली होती. हे जंगल १,५३६ पेक्षा जास्त चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापून आहे. या अभयारण्यात दोनशेपेक्षा जास्त संख्येने पट्टेरी वाघ, जंगली हत्ती, बिबट्या, कोल्हे, चितळ, हरीण, नीलगाय, अस्वल, रानगवा, रान डुक्कर, रान कुत्रे, लंगूर याचबरोबर अनेक प्रकारच्या विषारी व बिनविषारी सर्प प्रजाती, २५५ पेक्षा अधिक स्थलांतरित व स्थानिक पक्षी प्रजातींचा आढळतात. अनेक प्रकारचे वनवृक्ष, बहुत करून साल, मोह, बांबू, सपुष्प व अपुष्प वेली, गवत व वनस्पतींचे प्रकार आढळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT