Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath Shinde esakal
जळगाव

CM Shinde Jalgaon Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्यात

सकाळ वृत्तसेवा

CM Shinde Jalgaon Daura : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (ता.४) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. सकाळी साडे नउला मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने जळगावकडे प्रयाण. सकाळी साडे दहाला जळगाव विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पोलिस मुख्यालय हेलिपॅड वाशिमकडे रवाना होतील. (Jalgaon Chief Minister of state Eknath Shinde is coming on visit to district)

दुपारी तीनला पोलिस मुख्यालय हेलिपॅड, वाशिम येथे आगमन व हेलिकॉप्टरने मौज मुंढोळदे (खडकाचे) येथे मुक्ताईनगर (जि.जळगाव) कडे प्रयाण करतील. दुपारी चारला मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड (ता. मुक्ताईनगर) जळगाव येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण करतील.

सायंकाळी चारला मुंढाळदे (खडकाचे) (ता. मुक्ताईनगर) ते सुलवाडी ऐनपूर (ता. रावेर), जळगाव या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाचे बांधकामाचे भूमीपुजन करतील. सायंकाळी पावणे पाचला आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, सायंकाळी पाचला मौजे कोथळी (ता. मुक्ताईनगर). (latest marathi news)

येथे श्री. संत मुक्ताई मंदिर येथे दर्शन, सायंकाळी पाचला मोटारीने मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅडकडे प्रयाण, सायंकाळी सव्वा पाचला मौज मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड येथ हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण करतील.

पावणे सहाला जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने खेडी जळगावकडे प्रयाण, सायंकाळी सहाला खेडी जळगाव येथे आगमन व वारकरी भवनाचे भूमिपुजन करतील. सायंकाळी सहा वाजून दहा मिनीटांनी मोटीरीने जळगाव विमानतळकडे प्रयाण करतील. सायंकाळी सहा वाजून वीस मिनीटांनी जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT