jalgaon city temperature rises to 47 degree celsius
jalgaon city temperature rises to 47 degree celsius esakal
जळगाव

Jalgaon Temperature Rise : तापमान ४७ अंश पार...! जळगाव ठरतेय सर्वांत ‘हॉट’

सकाळ वृत्तसेवा

Jalgoan News : जिल्ह्यात ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे सलग चौथ्या दिवशी जळगाव जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक ‘हॉट’ ठरतोय.

आज वेलनेस वेदर या खासगी संस्थेने जळगावचे कमाल तापमान तब्बल ४६.७ अंश तापमानाची नोंद केली आहे. तर ममुराबादच्या शासकीय हवामान केंद्रात जळगावच्या कमाल तापमानाचा पारा ४५ अंश नोंदला गेला. (jalgaon city temperature rises to 47 degree celsius news)

जळगाव जिल्ह्यात आठवड्यापासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांत तर कमाल तापमानाची विक्रमी नोंद झाली. केवळ आठवड्याभरात कमाल तापमानातील फरक ७ ते ८ अंशांवर पोचला असून, त्यामुळे नागरिक या उष्म्यात अक्षरश: होरपळून निघत आहेत.

जळगावसह जिल्ह्यातील शहरांचे गेल्या आठवड्यापासून तापमान ४३ ते ४४.९ अंशांवर नोंदले जात आहे. शनिवारी जळगावचे कमाल तापमान ४५ अंश नोंदले गेले, तर वेलनेस वेदर या खासगी एजन्सीच्या दाव्यानुसार जळगावचे कमाल तापमान ४७.२ अंश होते. दुपारी तीन ते पावणे चार दरम्यान ४८.५ अंश तापमान असल्याची जाणीव होत होती.

भुसावळ, वरणगाव, चोपडा या शहरांमध्येही कमाल तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोचला आहे. तापमान वाढीमुळे शहरासह जिल्ह्यातील रस्ते र्निमनूष्य होताहेत. महामार्गावरील वाहतूकही दुपारी थांबलेली दिसते. अनेक वाहनधारक महामार्गा शेजारी असलेल्या झाडाच्या सावलीत थांबलेली दिसतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुपारी पक्षी दिसेनासे

तापमानातील वाढीचा पक्षांवरही परिणाम झाला आहे. दुपारी बारापासूनच कावळे, कबुतर, चिमण्या आदी पक्षी दिसेनासे होतात. सायंकाळी सहानंतर मात्र विविध ठिकाणच्या बगिच्यात चिमण्यांचा चिवचिवाट दिसतो. तापमानाचा पशूपक्षांवरही परिणाम झालेला दिसून येत आहे.

वेलनेस वेदरने घेतलेली नोंद

जिल्ह्यातील तापमान

जळगाव--४६.७ अंश

भुसावळ--४६.७

अमळनेर--४६.८

बोदवड--४६.३

भडगाव--४६.७

चोपडा--४६.९

चाळीसगाव--४६.६

धरणगाव-- ४६.७

एरंडोल--४६.६

फैजपूर--४६.५

जामनेर--४६.७

मुक्ताईनगर--४६.८

पारोळा--४४.८

पाचोरा--४६.४

रावेर--४६.६

वरणगाव--४६.८

यावल--४६.७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Khadse: "मी निवडणूक लढवणार नाही, पण..." राजकीय संन्यासाबाबत एकनाथ खडसे थेटच बोलले

Jitendra Awhad: “सगळ्यांना पाडता मग मुलाला का निवडून आणलं नाही?”, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल

IPL 2024 : KKRच्या खेळाडूवर BCCIने घेतली मोठी ॲक्शन; कारवाईचे कारण अस्पष्ट पण दिली 'ही' शिक्षा

Cucumber Recipies : हेल्दी अन् टेस्टी.! कडक उन्हाळ्यात शरीराला गारवा देणाऱ्या काकडीच्या सोप्या रेसिपीज

Latest Marathi News Live Update : बराकपूरमध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो

SCROLL FOR NEXT