Chief Minister Eknath Shinde speaking at a dialogue meeting here on Saturday. dignitaries on the platform. esakal
जळगाव

CM Eknath Shinde : शिक्षक, संस्था चालकांच्या मागण्या पूर्ण करू : मुख्यमंत्री शिंदे

CM Eknath Shinde : शिक्षक हा समाजाला शिक्षित करतो. नवीन युवा पिढी घडविण्याचे काम करतो. शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे.

सकाळ वृत्तसेवा

CM Eknath Shinde : शिक्षक हा समाजाला शिक्षित करतो. नवीन युवा पिढी घडविण्याचे काम करतो. शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आमच्या सरकारने शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अनेक योजना राबविल्या आहे. विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणुकीनंतर शिक्षक, शिक्षण संस्था चालकांच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (शनिवारी) येथे दिले. (CM Eknath Shinde statement on We will meet demands of teachers institute operators )

शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आदित्य लॉन्सवर संवाद मेळावा झाला. त्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की शिक्षक आदराचे स्थान आहे. आई- वडीलांनंतर शिक्षकांना आदर दिला जातो. शिक्षक विद्यादानाचे पवित्र कार्य करतात. यामुळे त्यांचे प्रश्‍न सोडविण्याची जबाबदार शासनाची असते. मी ती जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्‍न सोडवून पार पाडली आहे. शिक्षक आपले वैभव आहे.

ते ठरविले तर काहीही करू शकतात. त्यांना नाराज करून चालणार नाही. मी सामान्यांचा मुख्यमंत्री आहे. सोबतच साधा कार्यकर्ता आहे. यामुळे सर्वांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न असतो. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे चांगला माणूस आहे. शिक्षकांसाठी ते गेली पाच वर्षे झटले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की दोन वर्षात अकरा वेळा मुख्यमंत्री शिंदे जळगाव जिल्ह्यात आले. (latest marathi news)

असा सर्वसामान्य मुख्यमंत्री मी पाहिला नाही. त्यांचा मला अभिमान आहे. ते सर्वसामान्यांनाही भेटतात. त्यांचे प्रश्‍न सोडवितात. ते विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ जळगावला आले आहेत. यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. नक्कीच आमदार दराडेंना मताधिक्य मिळवून देवू. जळगावला महायुतीचे दोन्ही खासदार मताधिक्यांनी निवडून आले आहेत. तसे आमदार दराडेंनाही आणू.

दराडे यांनी शिक्षकांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली. आमदार राजूमामा भोळे, इकराचे अध्यक्ष करीम सालार यांनी मनोगत मांडले. खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार संजय सावकारे, आमदार लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत पाटील, गोदावरीच्या संचालिका डॉ.केतकी पाटील, शिवसेना चे जिल्हा प्रमुख नीलेश पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Astrology : विधानसभा बरखास्त होण्याचा अंदाज ते अन्य राज्यातील सरकारं अस्थिर होण्याची शक्यता...काय सांगतं या आठवड्याचं राजकीय भविष्य?

Latest Marathi News Updates : कालव्याचं काम ४५ वर्षांपासून सुरू, ग्रामस्थांकडून आमरण उपोषण

Mumbai Indians, RCB च्या खेळाडूंसह १३ भारतीयांची वेगळी वाट! परदेशातील लीगच्या ऑक्शनसाठी नोंदवली नावं

ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट, प्रिया जेलरच्या डोळ्यात धूळ फेकून तुरुंगाबाहेर, अश्विन पुन्हा तिच्या जाळ्यात अडकणार

Ganesh Chaturthi 2025 Puja: गणपती पूजेत लागणाऱ्या साहित्याची आजच करा यादी, आयत्यावेळी होणार नाही गडबड

SCROLL FOR NEXT