Superintendent of Police Dr. with the cattle stealing gang. Maheshwar Reddy etc. esakal
जळगाव

Jalgaon: विविध राज्यातून गुरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! निंभोरा पोलिसांच्या कारवाईत 5 अटकेत; 11 म्हशींसह, 16 लाखांचा ऐवज जप्त

Crime News : निंभोरा पोलिसांच्या हाती चक्क आंतराज्यीय गुरे चोरणारी टोळी हाती लागली असून, त्यांच्याकडून ११ जनावरांसह २ बोलेरो, २ दुचाकी, असा १६ लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : निंभोरा (ता. रावेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पाच म्हशी चोरीला गेल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करीत असताना, निंभोरा पोलिसांच्या हाती चक्क आंतराज्यीय गुरे चोरणारी टोळी हाती लागली असून, त्यांच्याकडून ११ जनावरांसह २ बोलेरो, २ दुचाकी, असा १६ लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. (crime Cattle stealing gang busted from different states)

२४ एप्रिल आणि १० जूनला म्हशी चोरीला गेल्या होत्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे, ज्ञानेश्वर चौधरी, अविनाश पाटील यांनी तीन महिन्यात तब्बल ६० साठ ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचे संकलन करून संशयितांची छायाचित्रे मिळविली. सहाय्यक निरीक्षक बोचरे यांनी फैजपूरचे निरीक्षक नीलेश वाघ आणि पोलिसांच्या मदतीने संशयित तुकाराम रुमालसिंग बारेला (रा.मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले.

त्याने चौकशीत टोळीचे नावे सांगितली. त्यावरून पोलिसांनी मध्य प्रदेशातून तुकाराम बारेला याचे साथीदार धर्मेंद्रसिंह दुरसिंग बारेला (रा. ढेरिया खंडवा), शांताराम बिल्लरसिंह बारेला (रा. हिवरा, बऱ्हाणपूर), सुभाष प्रताप निंगवाल (रा. दहिनाला), मस्तरीराम काशिराम बारेला (न्हावी, ता. रावेर) अशा सहा संशयीतांना अटक केली. (latest marathi news)

धर्मेंद्रसिंह याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असून, मध्य प्रदेशातील ४ जिल्ह्यातून त्याला हद्दपार केले आहे. या टोळीने सिल्लोड, बुलढाणा, मुक्ताईनगर, फैजपूर, रावेर यांसह मध्य प्रदेशातून जनावरे चोरी करून कत्तलीसाठी विक्री केल्याची माहिती उघडकीस आल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT