Burglary esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दाणा बाजारातील ड्रायफ्रूटचे दुकान फोडले; साडेचार लाखांची रोकड लंपास

Crime News : चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापताना कैद झाला आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : अवघ्या तीनच दिवसांपूर्वी शहर पोलिस ठाण्यासमोरील फुले मार्केटमधील चार दुकाने चोरट्यांनी फोडली होती. सोमवारी (ता. ३) दाणा बाजारातील दोन दुकाने फोडली. छताचा पत्रा कापून ड्रायफ्रूट्‌सच्या दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी गल्ल्यातील साडेचार लाखांची रोकड चोरून नेली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापताना कैद झाला आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon Crime Dry fruit shop in Dana Bazaar robbed)

गायत्रीनगरातील दिलीप शोभराजमल वाधवाणी यांचे दाणा बाजारात सच्चा सौदा नावाने ड्रायफ्रूटचे दुकान आहे. श्री. वाधवाणी यांनी शनिवारी (ता. १) व्यापाऱ्याला देण्यासाठी आणलेले पैसे दुकानाच्या गल्ल्यात ठेवले होते. मात्र, व्यापारी न आल्यामुळे त्यांनी पैसे तेथेच ठेवून रात्री दुकान बंद करून ते घरी निघून गेले.

रविवारी (ता. २) दुकान बंद होते. दिलीप वाधवाणी यांचा मुलगा हर्ष वाधवाणी याने सोमवारी (ता. ३) सकाळी साडेदहाच्या सुमारास दुकान उघडले. त्यावेळी दुकानाचे छप्पर फाडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. तत्काळ हर्ष याने घडलेला प्रकार वडिलांना व पोलिसांना सांगितला. चोरट्याने गल्ल्यातील साडेचार लाख रुपये चोरून नेल्याचे समोर आले. (latest marathi news)

ते आले, त्यांनी पाहिले अन्‌ निघून गेले

घटनेची माहिती मिळाल्यावर शहर पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्याह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुकानाची पाहणी केली. त्यांना दुकानाच्या छतावरील पत्रा कापलेला दिसून आला. चोरटा दुकानाच्या मागील बाजूने पत्र्यावर चढून तो आत शिरल्याचे दिसून आले.

सीसीटीव्हीची वायर कापली

चोरीपूर्वी चोरट्याने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वायर कापून टाकल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT