Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 24 तासांत सराफ बाजार दरोड्याची उकल; पुण्यातून संशयित ताब्यात

Jalgaon Crime : सराफ बाजारातील भवानीमाता मंदिरासमोरील सौरभ ज्वेलर्स दुचाकीवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी फोडून ३२ लाख २९ हजार ५७४ रुपयांचा ऐवज लुटून नेला होता.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : सराफ बाजारातील भवानीमाता मंदिरासमोरील सौरभ ज्वेलर्स दुचाकीवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी फोडून ३२ लाख २९ हजार ५७४ रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या प्रकरणी पोलिस पथकाने पुण्यातून संशयिताला ताब्यात घेतले आहे, तर इतर तिघांची चौकशी सुरू आहे.(Sarafa Bazar robbery solved in 24 hours )

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक संदीप गावित यांनी घटनास्थळांची पाहणी करून पथके नियुक्त केली. काही तासांतच गुन्हे शाखेसह एका संयुक्त पथकाला पुण्याला पाठविण्यात आले. पुण्यातून एकाला पथकाने ताब्यात घेतले. दुसऱ्या पथकाने तिघांची चौकशी सुरू केली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून जानेवारीत केलेल्या लुटीचे धागेदोरेही गवसणार आहेत.

बाजाराची सुरक्षा धोक्यातच

सराफ बाजाराची सुरक्षा व्यवस्था तोकड्या स्वरुपात आहे. नेहमी मोठी घटना घडली, की पोलिस अधिकारी सराफ असोसिएशनची बैठक घेऊन सूचना देतात. नंतर ‘पुन्हा पहिले पाढे पच्चावन्न’, असा प्रकार घडतो.

सराफ बाजारात सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही आणि अलार्म सिस्टीमबाबत सूचना करण्यात येणार आहेत. सोबतच पोलिस गस्तही वाढवली जाणार आहे. दाखल दरोड्याच्या गुन्ह्याच्या तपास योग्य दिशेने सुरू असून, सध्या तरी काही सांगता येणार नाही, असे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : माता न् तू वैरिणी ! आईनेच एक महिन्याच्या चिमुकलीला तलावात बुडवले अन्...

Latest Marathi News Updates : उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी

Beed Crime: मद्यधुंद चालक-वाहकांनी दामटली बस; बीडजवळ प्रकार उघडकीस, प्रवाशांची घाबरगुंडी, गुन्हा नोंद

Paithan Pandharpur Road: पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम रखडले; अवमान याचिकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नोटीस

ULFA(I) claim Indian Army drone strike: ! भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर ड्रोन हल्ले केल्याचा दहशतवादी संघटना ULFA(I)चा दावा!

SCROLL FOR NEXT