Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चाकूहल्ल्यातील संशयित शुभम देशमुखला अटक

Jalgaon News : शहरातील लक्झरीमालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून फरारी झालेल्या सराईत गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

प्रतीक जोशी

अमळनेर : शहरातील लक्झरीमालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून फरारी झालेल्या सराईत गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. काही दिवसांपूर्वी शुभम देशमुख उर्फ दाऊद याने जयवंत पाटील या लक्झरीमालकाशी वाद घालत पोटात चाकू मारला होता. त्यात त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. (Jalgaon Crime Shubham Deshmukh arrested in knife attack)

हल्ला केल्यानंतर देशमुख फरारी झाला होता. तो शहरात आल्याची चर्चा होती; मात्र पोलिसांच्या हातात लागत नव्हता. शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी गुन्हेगारांना अटक करण्याचे आवाहन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.

डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांना देशमुख हा धुळे येथे मालेगाव रस्त्यावर खानदेश खाणावळीत जेवण करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. नंदवाळकर यांनी त्वरित पोलिस निरीक्षक विकास देवरे यांना शुभमला अटक करण्यासाठी पथक पाठविण्याचे आदेश दिले. देवरे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे.

अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, नीलेश मोरे, सागर साळुंखे, मधुकर पाटील यांच्या पथकाला रवाना केले. तोपर्यंत दाऊद तेथून पळून जाऊ नये म्हणून त्याला ताब्यात घेण्यासाठी नंदवाळकर यांनी आझाद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस गौतम सपकाळे, अझरुद्दीन जयरोद्दीन शेख यांना पाठविले. धुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर अमळनेर पोलिसांनी शुभमला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT