Jalgaon Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : संबंध ठेवून विवाहास तरुणाचा नकार; अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल

Jalgaon Crime : विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवून लग्नास विरोध करणाऱ्या सडावण येथील तरुणासह त्याच्या बहीण मेहुण्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवून लग्नास विरोध करणाऱ्या सडावण येथील तरुणासह त्याच्या बहीण मेहुण्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. शिंदखेडा येथील एका तरुणीचा विवाह सडावण (ता. अमळनेर) येथील समाधान ऊर्फ राज पंडित दाभाडे याच्याशी ठरला होता. २६ जानेवारीला शिंदखेडा येथे त्यांचा साखरपुडा झाला. यादरम्यान समाधान व पीडित मुलगीचे मोबाईलवर बोलणे व्हायचे. ( Young man refused to marry after having an affair )

२३ एप्रिलला समाधान याने भावी पत्नीला फोन करून कपडे घ्यायचे आहेत, म्हणून ‘एकटी ये’, असे सांगितले. मुलीने माझे वडील एकटी येऊ देणार नाहीत, असे सांगितले. त्यावर त्याने सांगितले, की ‘माझे बहीण मेहुणेही सोबत आहेत. तू एकटी आली नाही, तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही’. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी संमती दिली. मुलगी बसने अमळनेरला आली. समाधान तिला घ्यायला आला. त्याने मुलीला बहीण सपना व मेहुणे मुकेश साळुंखे यांच्या घरी नेले.

तेथून दोघांनी समाधान व मुलीला खरेदीसाठी पाठविले. समाधान याने कपडे खरेदी न करता खाण्यापिण्यात वेळ घालवून उशीर केला आणि परत बहिणीच्या घरी नेले. तोपर्यंत बहीण मेहुणे सडावण येथे निघून गेले होते. मुलीने समाधानला मामाच्या घरी ताडेपुरा येथे सोड, असा आग्रह धरला. मात्र, समाधानने ऐकले नाही व रात्रभर येथेच थांबून शारीरिक संबंध करण्याचा आग्रह धरला. मुलीच्या इच्छेविरुद्ध त्याने बळजबरीने शारीरिक संबंध केले आणि कोणाला सांगितले तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही, अशी धमकी दिली.

२९ एप्रिलला लग्न असल्याने मुलीने भीतीपोटी कोणालाच सांगितले नाही. २८ एप्रिलला त्याने लग्न करण्यास नकार दिला. आजपर्यंत समाजाच्या लोकांची मध्यस्थी करून वाट पाहूनही त्याने लग्नास नकार दिला, म्हणून तरुणीच्या फिर्यादीवरून समाधान, त्याची बहीण सपना, मेहुणे मुकेश साळुंखे यांच्याविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT