heavy rain cotton crop Crisis File photo esakal
जळगाव

Jalgaon Heavy Rain : जिल्ह्यात परतीच्या पावसाने 4 हजार हेक्टरवर नुकसान! कापूस सर्वाधिक प्रभावित; शेतकरी हवालदील

Latest Jalgaon News : यावल, जामनेर, मुक्ताईनगर व चोपडा या चार तालुक्यांतील ४२ गावांतील ७ हजार ५९४ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Heavy Rain : जिल्ह्यात परतीच्या पावसाने चार हजार २२९ हेक्टरवरील कापूस, केळी, सोयाबिन पिकांचे नुकसान झाले आहे. यावल, जामनेर, मुक्ताईनगर व चोपडा या चार तालुक्यांतील ४२ गावांतील ७ हजार ५९४ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यात कपाशीचे सर्वाधिक चार हजार १६६ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. (Damage to 4 thousand hectares due to return rain in district)

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अगोदर अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला उडीद, मूग हातचा गेला. आता परतीचा पाऊस कापसाचे मोठे नुकसान करीत आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.

त्याचा सर्वाधिक फटका मुक्ताईनगर तालुक्याला बसला आहे. शेतकऱ्यांची कपाशीला लागलेली बोंडे गळून पडली आहे, तर काही ठिकाणी बोंडे काळी पडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन कमी येणार आहे. जी पिके आहेत त्याचा दर्जाही खालावणार आहे. यामुळे कपाशीला यंदा योग्य दर मिळतो, की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. (latest marathi news)

तालुकानिहाय नुकसान असे

तालुका--हेक्टर

यावल--३

जामनेर--३

मुक्ताईनगर--४ हजार १६६

चोपडा--५८

एकूण--४ हजार २२९

"यंदा अतिवृष्टी व परतीच्या पाऊस धुमाकूळ घालत आहे. उडीद, मूग हाता तोंडाशी आलेला असताना, अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता परतीचा पाऊस कपाशीला खराब करतोय. शासनाने हेक्टरी २० हजार रुपयांची भरपाई द्यावी."

- खेमचंद्र महाजन, शेतकरी

"आता विधानसभेची आचारसंहिता लागू होणार आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यात न पडता सरसकट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २० हजारांची भरपाई द्यावी. ‘एनडीआरएफ’चे निकष लावू नयेत. परतीच्या पावसाने कापसाचे मोठे नुकसान झाले आहे."

- एस. बी. पाटील, सदस्य, शेतकरी समन्वय समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satellite Toll System : नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा झटका, सॅटेलाईट टोल टॅक्स कलेक्शन प्रोजेक्ट स्थगित; नेमकं कारण काय?

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज; महाराष्ट्राच्या गोलंदाजांची धुलाई

Property Law: आई असेपर्यंत आजोबांच्या मिळकतीत हिस्सा नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निकाल

Latest Marathi News Live Update : रायगडच्या महाडमध्ये दोन पक्षातील समर्थकांमध्ये तुफान राडा

लेकाच्या संगीत सोहळ्याला आदेश भाऊजींचा त्यांच्या होममिनिस्टरबरोबर धमाल डान्स

SCROLL FOR NEXT