police recruitment
police recruitment  esakal
जळगाव

Police Bharati 2024 : पोलिस भरतीसाठी अर्जदारांना ‘गोल्डन चान्स’

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पोलिस भरतीसाठी यापूर्वी ३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी Mahait यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले आहे. त्यासाठी उमेदवारांना लागणारे एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने सर्व उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ एप्रिल २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. (Jalgaon Deadline for filling online application form for police recruitment extended till 15 april)

पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अंतिम दिनांकापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास प्रमाणपत्र अर्जाच्या पोच पावतीसह अर्ज सादर करावा.

मात्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे, अशी माहिती अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे. (latest marathi news)

पोलिस शिपाई, पोलिस शिपाई-वाहन चालक, पोलिस शिपाई-एसआरपीएफ आणि कारागृह शिपाई या पदांसाठी बारावी उत्तीर्ण अर्ज करू शकतील.

पोलिस बॅन्डस्मन पदासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील. एकूण सुमारे १७ हजार ३११ जागांसाठी सदरची पोलिस भरती होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT