Oxygen Oxygen
जळगाव

तिसऱ्या लाटेची तयारी;जळगावात १४२ टन ऑक्सिजनची निर्मीती

प्लांटमधून दररोज ५० ते १०० सिलिंडर ऑक्सिजन तयार करून भरला जाईल.

देविदास वाणी



जळगाव ः कोरोना (corona) महामारीची दुसरी लाट (corona second wave) ओसरल्यात जमा आहे. तिसऱ्या लाटेचा (corona third wave) सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा अधिक जाणवला. बेडची संख्या कमी होती. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता पडू नये, यासाठी जिल्ह्यात तब्बल १२ ठिकाणी ऑक्सिजन प्लांटनिर्मितीचे कार्य सुरू आहे. पाचोरा येथे आमदार निधीतून, तर रावेर, अमळनेर, धरणगाव, भडगाव, पारोळा या ठिकाणी शासकीय निधीतून ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात येतील. एकत्रित प्लांटमुळे जिल्ह्यात एकूण १४२ टन ऑक्सिजननिर्मिती रोज होणार आहे.

(jalgaon distict corona third wave Preparation one hundred forty two tons oxygen production)


सध्या जिल्हा कोविड रुग्णालय, भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ऑक्सिजननिर्मिती सुरू आहे. मोहाडी येथील रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लांट तयार होत आहेत, तर जिल्हा रुग्णालयात एक, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, जामनेर या ठिकाणचे ऑक्सिजन फाउंडेशन पूर्ण झाले असून, निर्मिती प्लांटही तयार आहे. जनरेटर लावणे, वीज कनेक्शन देणे ही कामे बाकी आहेत. लवकरच प्लांटचे काम पूर्ण होईल व ऑक्सिजननिर्मिती प्रक्रिया सुरू होईल, तर पाचोरा येथे आमदार निधीतून, तर रावेर, भडगाव, अमळनेर, पारोळा, धरणगाव येथे ऑक्सिजन प्लांट तयार करण्याबाबत नुकत्याच वर्कऑर्डर देण्यात आल्या आहेत. या प्लांटमधून दररोज ५० ते १०० सिलिंडर ऑक्सिजन तयार करून भरला जाईल.

सर्व प्लांटमध्ये ऑक्सिजननिर्मितीची वेगवेगळी क्षमता आहे. ती एकत्र केली असता, १४२ टन एवढी ऑक्सिजननिर्मिती होणार आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होईल, अशी शक्यता आहे. आरोग्य यंत्रणेने त्यांच्याकडील पाच डॉक्टर, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील दहा, अशा १५ शासकीय बालरोगतज्ज्ञांना तिसऱ्या लाटेत उपचारासाठी बोलविण्यात येणार आहे.


पाचोरा येथे आमदार निधीतून, तर रावेर, अमळनेर, धरणगाव, भडगाव, पारोळा या ठिकाणी शासकीय निधीतून ऑक्सिजन प्लांटनिर्मितीसाठी नुकत्याच वर्कऑर्डर दिल्या आहेत. पूर्वीचे प्लांट आठ दिवसांत कार्यान्वित होतील. मात्र, जेव्हा रुग्ण वाढतील तेव्हा ते सुरू केले जातील.
-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT