Jalgaon District Court esakal
जळगाव

Jalgaon District Court : कल्याण न्यायालयाने दरोडेखोरांचा जामीन फेटाळला!

Jalgaon News : शहरातील तब्बल २९ सराफा व्यापाऱ्यांची ५ कोटी ४० लाख रुपये घेऊन जाणाऱ्या दहा दरोडेखोरांचा जामीन कल्याण जिल्‍हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील तब्बल २९ सराफा व्यापाऱ्यांची ५ कोटी ४० लाख रुपये घेऊन जाणाऱ्या दहा दरोडेखोरांचा जामीन कल्याण जिल्‍हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. जळगाव शहरातील २९ सराफा व्यापाऱ्यांतर्फे १३ मार्च २०२४ ला ५ कोटी ४० लाखांची रोकड घेऊन संतोष थोरात मुंबईच्या दिशेने रवाना झाले. खासगी कुरियरद्वारे ही रक्कम पीकअप व्हॅनमधून पाठविली होती. (District Court Kalyan Court rejected bail of robbers)

सुसाट कारने पाठलाग करून व्हॅनला आटगावजवळ बॉम्बे ढाब्याच्या अलीकडेच पोलिस असल्याचे भासवून व्हॅन आडविले होते. सशस्त्र दरोडेखोरांनी संतोष थोरात, चालकाला कोयता, चाकू, टॉमी लावून त्यांना कारमध्ये बसवून रोकड असलेली व्हॅन ताब्यात घेतली. एका गुदामात व्हॅनमधून ५ कोटी ४० लाख काढल्यावर चालक व साक्षीदारांना निर्जनस्थळी सोडले होते.

बारा संशयितांवर गुन्हा दाखल

संतोष सोनार यांनी जवळच्या गावातून जळगावला संपर्क साधल्यावर घडल्या प्रकाराचा उलगडा झाला. याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात १२ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

यांना केली अटक

शहापूर पोलिसांनी संशयित दरोडेखोर राम पाटील, चंद्रकांत गवारे, संजय चौघुले, बशीर शेख, नितीन जाधव, नितीन नाईकडे, विजय बारमासे, अमित नार्वेकर, शिवशंकर उत्तम डे, अक्षय वेखंडे यांना एप्रिलमध्ये अटक केली. त्यांच्याकडून ४ कोटी ८५ लाख रुपये जप्त केले. (latest marathi news)

१ कोटी ३७ लाख ८५ हजार ४६५ रक्कम जप्त करणे बाकी असताना, संशयितांनी कल्याण जिल्‍हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश मंगला मोटे यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी होऊन सरकार पक्ष आणि तपासाधिकाऱ्यांनी जामिनास विरोध केला. फिर्यादीतर्फे ॲड. शुभम काहिटे.

ॲड. दर्शन साहुजी यांनी संशयितांनी केलेल्या गुन्ह्यांचे गांभीर्य, एकूण रकमेपैकी संशयितांकडून उर्वरित रक्कम जप्त करणे बाकी आहे. अटकेतील संशयित अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्यावर इतरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर ‘मकोका’अंतर्गत कारवाईची मागणी लावून धरली. सरकार पक्ष, तपासाधिकारी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व संशयितांचा जामीन फेटाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading 2025: 'मुहूर्त ट्रेडिंग'च्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 267 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

Bhandara News: भंडाऱ्यातील पोलिस पाटील भरती प्रक्रिया रद्द; उच्च न्यायालय, संपूर्ण निवड प्रक्रिया संशयास्पद आणि अयोग्य

Heart Attack Case : महाकाल मंदिरात भस्मआरतीदरम्यान भक्ताचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; WhatsApp स्टेट्सवर लिहिलं होतं, 'आयुष्य क्षणभंगुर आहे...'

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या एसटीपीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता; पाच कोटींचं विशेष अनुदान

Kolhapur Killing Mystery : कोल्हापुरातील 'त्या' दोघांचा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू नाहीचं, वृद्ध दांपत्याच्या मृत्यूचे गूढ वाढले

SCROLL FOR NEXT