Guardian Minister Gulabrao Patil esakal
जळगाव

Jalgaon News : फेब्रुवारीत जिल्हा महासंस्कृती महोत्सव; 5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची जळगावकरांना मेजवानी लाभणार आहे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची जळगावकरांना मेजवानी लाभणार आहे.

जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करावे. (jalgaon District Mahasanskrit Mahotsav in February news)

खानदेशातील स्थानिक कलाकारांना‌ या महोत्सवात व्यासपीठ मिळावे यासाठी स्थानिक‌‌ लोक कलाकारांना या महोत्सवात सहभागी करून घ्यावे, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी (ता.२३) येथे दिल्या.‌

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‌हा महोत्सव होणार आहे. या‌ महोत्सवाच्या नियोजनाची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.‌

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या महोत्सवात आयोजित करावयाच्या कार्यक्रमांबाबत चर्चा झाली. पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले की, नागरिकांना सोयीचे ठरेल अशा मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करावे.

साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या १५ ते १९ या तारखांदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करावे.‌ चला हवा येवू द्या, महाराष्ट्राची हास्य जत्रा, सारेगमप, इंडियन आयडॉलमधील कलाकारांना आमंत्रित करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी करावी.

जिल्हा नियोजन, महावितरण आढावा

यावेळी जिल्हा वार्षिक योजनेतील २०२३-२४ मधील मंजूर कामे व प्रलंबित कामांचा आढावाही पालकमंत्र्यांनी घेतला. आचारसंहितेपूर्वी सर्व कामे पूर्ण होतील, या दृष्टीने कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून महावितरण विभागाला दिलेल्या निधीतून सब-स्टेशन, फिडरच्या कामांना गती द्यावी. कोणत्याही गावांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. याची दक्षता घेण्याची सूचना देण्यात आल्या.

आरक्षण सर्वेक्षण आढावा

शासनातर्फे मंगळवार (ता.२३) पासून सुरू झालेल्या मराठा व खुला प्रवर्ग आरक्षण सर्वेक्षणाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचे पालकमंत्र्यांपुढे सादरीकरण केले.

सर्वेक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. यासाठी सर्वेक्षणात सहभागी सर्वेक्षक, प्रगणक व नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT