Jalgaon District Milk Union Election esakal
जळगाव

Milk Union Election | शेतकरी, संघाच्या हितासाठी आपली लढाई : आ. चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा दूध संघातील आपण गैरव्यवहार काढला आहे. त्यात आपले कोणतेही वैयक्तिक हित नाही. शेतकरी आणि संघाच्या हितासाठीच आपली लढाई आहे, असे मत आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीसाठी आपण प्रचार सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Jalgaon District Milk Union Election Farmers their fight for interest of Union statement by MLA Chavan jalgaon news)

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीबाबत ते म्हणाले, की भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे पॅनल आमचे आहे. इतर पक्षातील सदस्यांनी आमच्याकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आमचे सर्वपक्षीय पॅनल असणार आहे. निवडणूक लढणार हे निश्‍चित आहे. पॅनलच्या माध्यमातून लढणाऱ्या उमेदवारांचा प्रचारही आम्ही सुरू केला असून, मतदारांची आम्ही प्रत्यक्ष भेट घेणे सुरू केले आहे. संघाची निवडणूक लढविण्याची आमची भूमिका आम्ही मतदारांना सांगणार आहोत.

जिल्हा दूध संघाच्या गैरव्यवहाराबाबत आमदार चव्हाण म्हणाले, की जिल्हा दूध संघाच्या गैरव्यवहाराची लढाई मोठी आहे, ती आपण लढत आहोत. यात आपले कोणतेही वैयक्तिक हित नाही. दूध उत्पादक शेतकरी आणि संघाचे हित जोपासण्यासाठी आपली ही लढाई आहे. अखाद्य तुपाबाबत झालेला गैरव्यवहार मोठा आहे.

अखाद्य तुपातून चॉकलेट बनविले जात असतील, तर मुलांच्या जीवाशी खेळले जात आहे किंवा चांगले तूप अखाद्य म्हणून विक्री करून त्यातूनही मोठा गैरव्यवहार होत असेल, हेही गंभीर आहे. त्यामुळे आगामी काळात सत्य बाहेर येईलच. याशिवाय संघात होत असलेल्या त्रासाची माहिती आपल्याला काही कामगारांनी वैयक्तिक भेटूनही दिली आहे. त्यामुळे आता हे सर्व बाहेर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: शुक्रादित्य राजयोगामुळे वृषभ राशीसह 5 राशींना मिळेल आदर अन् संपत्ती, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Marathi News Live Update : मिरा-भाईंदरच्या उत्तनपासून विरारपर्यंत कोस्टल रोड सुरु करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

IPL ची कॉपी करायला गेले अन् पाकडे तोंडावर आपटले; कवडी भावात विकली गेली PSL मधील हैदराबाद फ्रँचायझी, रिषभ-श्रेयस मिळून एवढे कमावतात...

SCROLL FOR NEXT