Shukshukat at Akashvani Chowk on Monday afternoon & scarves tied by young women to protect from the sun. esakal
जळगाव

Jalgaon Summer Heat : जिल्ह्याचे तापमान 46 अंशावर! दिवसभर उन्हाच्या झळा; महामार्गासह शहरात दुपारी शुकशुकाट

Jalgaon News : यंदाच्या उन्हाळ्यात एवढे तापमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या दोन दिवसांपासून सलग ४४ अंश तापमान होते

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Summer Heat : जिल्ह्यातील तापमानाने सोमवारी (ता. २०) उच्चांकी ४६ अंश गाठले. यंदाच्या उन्हाळ्यात एवढे तापमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या दोन दिवसांपासून सलग ४४ अंश तापमान होते. सोमवारी तापमानात दोन अंशांनी वाढ होऊन ते ४६ अंशांवर पोचल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. (Jalgaon District temperature at 46 degrees)

गेल्या दोन दिवसांपासून सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. रात्री आठपर्यंत उन्हाच्या झळ जाणवत आहेत. वृद्धांसह बालके, गर्भवती महिलांना उन्हाचा त्रास होत आहे. सर्वच नागरिक उन्हामुळे हैराण झाले आहेत. सकाळपासून उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाहीलाही होत आहे.

बाजारापेठांमध्ये ग्रीननेट लावून सावली मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अपार्टमेंट, दुमजली घरांवरही ग्रीननेट लावून सावली मिळविली जात आहे. उन्हाच्या तीव्रतेने बाजारपेठा दुपारी ओस पडत आहे. रस्त्यावरील शुकशुकाट वाढला आहे. महामार्गावरही मोठी वाहने झाडाच्या सावलीत लावून नागरिक विश्रांती घेताना दिसतात.

थंड पाण्याची मागणी वाढली

उन्हामुळे शरीरातून घामाच्या धारा बाहेर पडतात. घशाला कोरड पडून जीव पाणी पाणी करतो. यामुळे बाजारात थंड पाण्याला मागणी वाढली आहे. शहरात आलेला प्रत्येक नागरिक पाण्याची बाटली कोठे मिळेल, याचा शोध घेऊन तृष्णा शमविताना दिसत आहे. थंड पाण्याबरोबरच शीतपेयांनाही मागणी वाढली आहे. (latest marathi news)

जिल्ह्यातील तापमान असे

जळगाव : ४६.१ अंश

भुसावळ : ४६.४

अमळनेर : ४६

बोदवड : ४६.१

भडगाव : ४६.२

चोपडा : ४६.३

चाळीसगाव : ४६.१

धरणगाव : ४६.२

एरंडोल : ४६

फैजपूर : ४६

जामनेर : ४६.४

मुक्ताईनगर : ४६.४

पारोळा : ४६

पाचोरा : ४६.२

रावेर : ४६.४

वरणगाव : ४६.४

यावल : ४६.३ अंश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT