Plastic and garbage accumulated in the drain near Triveni temple in the city. esakal
जळगाव

Jalgaon News : फैजपूर शहरातील नाले बनले ‘कचराकुड्या’; पालिकेकडून दुर्लक्ष

Jalgaon : पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा व्हावा, या साठी दरवर्षी पालिकेकडून शहरात नालेसफाई केली जाते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा व्हावा, या साठी दरवर्षी पालिकेकडून शहरात नालेसफाई केली जाते. नालेसफाईनंतर मात्र अवघ्या दोन, तीन महिन्यातच या प्रमुख नाले, गटारी भरगच्च भरून स्थिती ‘जैसे थे’ निर्माण होते. पालिकेतर्फे लाखोचा खर्च करूनही योग्य पद्धतीने नालेसफाई न होता वरवर नालेसफाई होत असल्याची ओरड सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस पालिकेतर्फे दरवर्षी नालेसफाई केली जाते. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख नाले, गटारी, भुयारी गटारी यांची नालेसफाईला करण्यात येते. (Jalgaon Drains in Faizpur city have become garbage )

शहरातील लेंडी नाल्यापासून सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुल व वीर सावरकर व्यापारी संकुलापासून आठवडे बाजारापर्यंत गेलेल्या प्रमुख मोठ्या गटारीची व शहरातील प्रमुख नाले, प्रमुख गटारी यांच्यातील पावसाच्या पाण्याच्या निचरा योग्य प्रकारे व्हावा, यासाठी साफसफाई करणे गरजेचे असते. नालेसफाईवर पालिकेकडून जवळपास दोन, अडीच लाख रुपये खर्च करण्यात येतो. ही नालेसफाई पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निगराणीत करून घेणे अपेक्षित असते.

मात्र पालिकेचे संबंधित अधिकारी या ठिकाणी न थांबता संबंधित ठेकेदाराच्या मर्जीतील सफाई कामगाराला नालेसफाई करून घेण्याची जबाबदारी दिली जाते. परंतु प्रत्येक्षात ज्या पद्धतीने नालेसफाई होणे अपेक्षित असते, त्या पद्धतीने होत नसल्याचे चित्र दिसून येते. मागच्या वर्षी मे महिन्यात अपेक्षित नालेसफाई ऑगस्टमध्ये पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात करण्यात आली. तीन महिने उशिरा नालेसफाई होऊनही पाण्याचा योग्य निचरा होईल, योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नसल्याची ओरड सुरू आहे.

शहरातील त्रिवेणी मंदिराजवळील नाला घाण, कचऱ्याने भरल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची ओरड पुढे आली आहे. एम. मुसा जनविकास मल्टिपर्पज सोसायटी यांनी पालिकेचे संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी सांगून सुद्धा मागील वर्षी नालेसफाई दरम्यान (कै.) बळीराम बापू वाघुळदे व्यापारी संकुल पुढे आठवडे बाजारापर्यंतची नालेसफाई अद्याप झालीच नाही. (latest marathi news)

इतकेच नव्हे तर एम मुसा जनविकास मल्टिपर्पज सोसायटीने पालिकेत अर्ज देऊन खंडोबा वाडीपासून धाडी नदीपर्यंत नाला साफ करण्यात यावा, असा अर्ज देऊनही उपयोग झाला नाही. दरम्यान, शहरातील खंडोबा वाडी लगतची गटार, त्रिवेणी मंदिराजवळील नाला यासह सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुलापासून आठवडे बाजारापर्यंत गेलेल्या प्रमुख मोठी गटार प्लॅस्टिक व गाळाने भरगच्च भरली आहे.

दोन, अडीच लाख रुपये खर्च करून अवध्या दोन, तीन महिन्यातच या प्रमुख गटारी भरगच्च भरून स्थिती ‘जैसे थे’ असते तर दरवर्षी नालेसफाईवर होणारा खर्चाचा विचार करता खरोखर योग्य पद्धतीने नालेसफाई होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

''फैजपूर येथील त्रिवेणी मंदिर परिसरातील मोठा नाला होळीच्या यात्रेपासून स्वच्छ केलेला नसून प्लॅस्टिक व गाळने गच्च भरला आहे. त्यामुळे नागरिकाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, याला जबाबदार कोण? वारंवार सांगूनही नगरपालिका प्रशासनाचे आरोग्य अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहेत.''- वैभव वकारे, नागरिक, फैजपूर

''(कै.) बळीराम बापू वाघुळदे व्यापारी संकुलाजवळील चेंबरमध्ये वरवर सफाई केली. त्यापुढे नालेसफाई दरम्यान टपरी कॉम्प्लेक्स ते आठवडे बाजारापर्यंतची नालेसफाई झालीच नाही. या सफाईसाठी वेळोवेळी सांगून सुद्धा उपयोग झाला नाही. म्हणून पालिकेत मार्च महिन्यात अर्ज देऊन खंडोबावाडीपासून धाडी नदीपर्यंत नाला साफ करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.''- शाकिर मलिक, अध्यक्ष एम मुसा जनविकास मल्टिपर्पज सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT