Consumers while buying vegetables in the main market. esakal
जळगाव

Jalgaon Vegetable Rate Hike : कांदा 40 रुपये, गवारसह कांदेपातने गाठली शंभरी; सर्वसामान्यांच गणित बिघडलं

Vegetable Rate Hike : मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेली मशागत व आवक कमी राहत असल्यामुळे भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

संजय पाटील

Jalgaon Vegetable Rate Hike : मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेली मशागत व आवक कमी राहत असल्यामुळे भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यात कांदा चाळीस रुपये किलो, तर गवार व कांदेपात १२० रुपये किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातील गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दैनंदिन वापरात भाजीपाल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच. (high cost of vegetables in Parola market )

रोज काय भाजी करावी, असा प्रश्न गृहिणींना नेहमीच पडत असतो. त्यातच २० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता पन्नास रुपयाला दीड किलो मिळत आहे. त्यामुळे गृहिणींचा याबाबत हिरमोड झालेला आहे. मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहेत. अनेक शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला व्यस्त झालेले आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी हे भाजीपाला उत्पादनाकडे दुर्लक्षित आहेत.

त्यातच भाजीपाला पिकविताना खर्च अधिक व उत्पन्न कमी, या अडचणींमुळे अनेक भाजीपाला पिकविणारे शेतकरी हेच हंगामी पिकांकडे वळलेले आहेत. दरम्यान, भाजीपाला विक्रेते यांना आपला दैनंदिन व्यवसाय सुरू ठेवणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे अनेक विक्रेते हे बाहेरगावाहून भाजीपाला खरेदी करीत ते घाऊक बाजारात विकताना दिसून येतात.

नाशिक, ओझर, जळगाव, धुळे येथून येतो पारोळ्यात भाजीपाला

पारोळा येथील भाजी बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे अनेक होलसेल भाजीपाला विक्रेते हे नाशिक, ओझर, जळगाव व धुळे येथून भाजीपाला विकत आणून ते लिलावाच्या माध्यमातून घाऊक भाजीपाला विक्रेते यांना भाजीपाला पुरविताना दिसून येत आहेत. त्यातच अनेक आडत दुकानदारांनी कांद्याची साठवणूक केल्याचे समजते. त्यामुळे कांद्याला वाढणारा भाव अशा व्यापाऱ्यांना दोन पैसे देऊन जाणारा आहे. (latest marathi news)

भाजीपाल्याचे दर किलोप्रमाणे

मेथी-१०० रुपये प्रति किलो

कांदा -४० रुपयेप्रति किलो

लसुन-२०० रुपये प्रति किलो

चवडी- ८० रुपयेप्रति किलो

गिलके -८० रुपये प्रति किलो

पत्ता कोबी-६० रुपये प्रति किलो

फुलकोबी ८० रुपये प्रति किलो

हिरवी मिरची- ८० रुपये प्रति किलो

टमाटे ८० रुपये प्रति किलो

गवार व कांदेपात -१२० प्रति किलो

आवक वाढण्याची शक्यता!

बाजारात सुरुवातीला रांगडा कांदा मिळत. मात्र, आता तो मिळत नसल्यामुळे अनेकजण कांदा विकत घेत आहेत. त्यामुळे कांद्याची आवक भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान वादळवारा किंवा अतिवृष्टी जाणवू लागली, तर बऱ्याच वेळा भाजीपाला उत्पादनात घट निर्माण होते. पर्यायाने आवक कमी असल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढत असल्याचे विक्रेत्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

''कांदा हा दैनंदिन वापरात येतो. त्यामुळे कांद्याचे भाव कमी व्हावेत. शिवाय दैनंदिन लागणारा भाजीपाल्याचे भावदेखील स्थिर असावेत.''- वैशाली चौधरी, गृहिणी, पारोळा.

''रोज ग्राहकांना भाजीपाला पुरविण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते. एखाद्या वेळेस जास्तीच्या भावाने भाजीपाला खरेदी करून त्यात घट लागते. त्यामुळे नफादेखील मिळत नाही. बऱ्याच भाजीपाला आवक नसल्यामुळे बाहेरगावांवरून आणावा लागतो.''-गोपाल महाजन, किरकोळ भाजीपाला विक्रेता, पारोळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

SCROLL FOR NEXT