Gold  esakal
जळगाव

Jalgaon Gold Rates Hike : सोने 12 हजार रुपयांनी महाग! विक्रीत दहा टक्के घट; दरवाढीचा परिणाम

Jalgaon News : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सर्वसामान्यांना सोने घेणे परवडत नाही

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Gold Rates Hike : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षयतृतीयेचा मुहूर्त सोने खरेदीसाठी पूर्ण मुहूर्त मानला जातो. यंदा सोन्याच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १२ हजार २०० रुपयांची वाढ प्रतितोळा झाल्याने सोने विक्रीत घट झाल्याचे पाहावयास मिळाले. सुमारे १५ टक्के घट दुपारी तीनपर्यंत दिसून आली. रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी होती. मात्र, सोने घेण्याचे प्रमाण ५ ग्रॅमवरून २ ग्रॅमवर आले होते. (Jalgaon Gold expensive by 12 thousand)

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सर्वसामान्यांना सोने घेणे परवडत नाही. मात्र, उधारी, उसनवारी, कर्ज घेऊन नागरिकांनी मुलींच्या लग्नात सोन्याचे खरेदी केल्याचे सांगण्यात आले.

सोने, चांदीमध्ये केलेली गुंतवणूक रोकडे देणारी मानली जाते. सोने, चांदी विकली, की मिळालेल्या पैशांतून नागरिक आपली आर्थिक गरज पूर्ण करताना दिसतात. यामुळे सोन्यात दरवर्षी गुंतवणूक वाढत आहे.

भारतातील एकूण सोन्याची वार्षिक मागणी १ हजार शंभर ते एक हजार दोनशे टन आहे. त्यात दरवर्षी वाढ होत आहे. त्यापैकी ५५ ते ६० टक्के खप ग्रामीण भागात होतो.

सोन्यात १ हजारांची वाढ

३० एप्रिलला सोन्याचा दर जीएसटीसह ७४ हजार १६० प्रतितोळा, तर चांदी जीएसटीसह ८३ हजार ४३० प्रतिकिलो होती. ८ मेस सोन्याच्या दरात ४५० रुपयांची वाढ होऊन सोने जीएसटीसी ७३ हजार ७९९ रुपयांवर पोचले, तर चांदी जीएसटीसह ८५ हजार ४९० पर्यंत पोचली होती. अक्षयतृतीयेच्या मुहर्तावर सोन्याच्या दर ७३ हजार ७९९ रुपयांवरून थेट ७४ हजार ६७५ (एक हजारांची वाढ), तर चांदीचा दर ८५ हजार ४९० वरून ८७ हजार ३५ (१५०० ची वाढ) जीएसटीसह झाला आहे. (Latest marathi news)

सोन्याचे काही दिवसांतील दर (विना जीएसटी)

तारीख--सोने (प्रतितोळा)--चांदी (प्रतिकिलो)

३० एप्रिल : ७२ हजार--८१ हजार

४ मे : ७१ हजार २००--८१ हजार

७ मे : ७१ हजार ६५०--८३ हजार

१० मे : ७२ हजार ५००--८४ हजार ५००

तीन वर्षांतील फरक असा विना जीएसटी

२०२२ मध्ये सोने ५० हजार ८३९ (प्रतितोळा)

२०२३ मध्ये ६० हजार ३००

२०२४ मध्ये ७२ हजार ५००

मागील वर्षीच्या तुलनेत १२ हजारांची वाढ

२०२२ ला सोन्याचे दर ५० हजार ८३९ होते. २०२३ ला सोन्याचे दर ६० हजार ३०० होते. यंदा सोन्याचे दर ७२ हजार ५०० (विना जीएसटी) आहेत. तब्बल १२ हजार दोनशे रुपयांची वाढ यंदा झाली आहे.

"अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपअकी एक मुहूर्त. या दिवशी सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतो. या सणाला ग्रामीण भागातील नागरिक कमी येतात. मात्र, शहरी भागातील नागरिकांची संख्या अधिक असते. यंदा दरवाढीचा परिणाम सोने विक्रीवर झाला आहे."

-सुशील बाफना, संचालक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स

"दागिन्यांना महिलांची मागणी होती. मणी मंगळसूत्र, नेकलेस, हार, अंगठी कानातील डूल, बांगड्या आदी दागिन्यांना पसंती होती. सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे मागील वर्षीच्या दहा ते १५ टक्के घट झाली आहे."-आदित्य नवलखा, संचालक, नवलखा ज्वेलर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT