Guardian Minister Gulabrao Patil informed about 'Spark Extracorporeal Shockwave Lithotripsy' machine at GMC. esakal
जळगाव

Jalgaon Gulabrao Patil : जीएमसी मध्ये आता मुतखड्यावर शोकव्हेव उपचार : पालकमंत्री पाटील

Jalgaon Gulabrao Patil : जिल्हा वार्षिक योजना निधीतून उभारलेल्या ई. एस.डब्लु. एल. सेंटर ऑफ एक्सलन्स'चे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) हस्ते झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Gulabrao Patil : आता मुतखड्याच्या ऑपरेशनसाठी गोरगरीबाला हजारो रुपये मोजावे लागणार नाहीत. अशी सोय जळगावमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचे समाधान आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगीतले. जिल्हा वार्षिक योजना निधीतून उभारलेल्या ई. एस.डब्लु. एल. सेंटर ऑफ एक्सलन्स'चे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) हस्ते झाले. (Jalgaon Guardian Minister Patil statement Shock wave treatment for kidney stones in GMC now)

अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, अरविंद देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी व डॉ. जितेंद्र सुरवाडे, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य सुविधा मजबूत व्हाव्यात यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून अनेक उपकरण घेतली जे महाराष्ट्रात इतरत्र नाहीत. आता मुतखडयासाठी नव्या पिढीतील तंत्रज्ञान असलेले 'स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी' ही उत्तर महाराष्ट्रात कुठेच नाही अशी अद्यावत मशीन जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बसविण्यात आली आहे. (latest marathi news)

रुग्णाला वेदना न होता ही मशीन काही सेंकदात मुतखडा फोडते आणि तें लघवी वाटे विना अडथळा बाहेर पडते. फक्त एक पॅरासिटॉमॉल गोळी खाऊन रुग्ण घरी जाऊ शकतो असे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी यंत्राची माहिती दिली.

नव्या यंत्राद्वारे होणारी एक विना-शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे. जी मूत्रमार्गाच्या काही भागांमध्ये मुतखडे फोडण्यासाठी शॉकवेव्ह वापरते. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी हा किडनी स्टोनसाठी एक सामान्य उपचार आहे. कधीकधी या प्रक्रियेला स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी (स्पार्क इएम ईएसडब्लयूएल) म्हणतात.

शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी मुतखडे फोडण्यासाठी उच्च-उर्जा शॉक (उच्चदाब) लहरी वापरते. किडनी स्टोनचे छोटे तुकडे नंतर मूत्रमार्गात अधिक सहजतेने जाऊ शकतात. मूत्रपिंडातील (किडणी) मुतखडे काढून टाकण्यासाठी अधिक आक्रमक शस्त्रक्रिया टाळण्यात ते मदत करु शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT