Superintending Engineer Prashant Sonwane while discussing with the contractors who are on hunger strike due to the payment of 850 crore rupees to the government for various development works. esakal
जळगाव

Jalgaon Hunger Strike : 150 कंत्राटदारांचे 850 कोटी थकले; जिल्ह्यातील स्थिती

Hunger Strike : शासनाची काम करताना शासनाकडून तुटपुंजा स्वरूपाचा निधी दिला जातो.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Hunger Strike : शासनाची काम करताना शासनाकडून तुटपुंजा स्वरूपाचा निधी दिला जातो. त्यामुळे काम करताना कंत्राटदाराना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, १०० टक्के निधी मिळावा, या मागणीसाठी गुरुवारी (ता. २७) जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील कंत्राटदारांनी लाक्षणिक उपोषण केले. जिल्ह्यात एकूण १५० कंत्राटदार असून, त्यांनी केलेल्या कामांचे तब्बल साडेआठशे कोटी रुपयांची बिलही शासनाकडे थकीत आहे. ()

दरवेळी बिलांसाठी निधी मिळावा, यासाठी आंदोलने केली जातात. त्यानंतरच थोडाफार निधी मिळतो. त्यामुळे काम पूर्ण करताना ठेकेदारांना मोठे अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक ठेकेदारांनी बँकेकडून कर्ज घेतले असून, आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे अधिवेशनामध्ये कंत्राटदारांना शंभर टक्के निधी देण्याबाबत ठराव केला जावा. वेळेत निधी मिळाला नाही, तर आगामी काळात सुरू असलेली शासनाची सर्व कामे बंद केली जातील, असा इशारा देण्यात आला. जळगाव जिल्हा लाक्षणिक उपोषण संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वखाली आंदोलन करण्यात आले. (latest marathi news)

यांचा होता सहभाग

या आंदोलनात प्रमोद नेमाडे, विकास महाजन, संजय पाटील, मिलिंद अग्रवाल, विनय बढे, प्रदीप पाटील, योगेश पाटील, उज्ज्वल बोरसे, सुशील डोंगरे, शेखर तायडे, श्रीराम चौधरी, अमोल महाजन, शरद पाटील, एल. एच. पाटील, आशिष कासट, सुनील पाटील, तुषार महाजन, अमोल कासट, सुधाकर कोळी, हर्शल सोनवणे, प्रतीक पाटील, किशोर पाटील, अजय पाटील, एम. एस. जैन, शशिकांत पाटील, राहुल तिवारी, चंद्रशेखर पाटील, विनोद पाटील.

सिद्धार्थ दाधीच, नितीन सपकाळे, मनीष चव्हाण, नीलेश पाटील, चेतन कापडणे, ज्ञानेश्वर पाटील, विलास पाटील, संदीप भोरटक्के, सचिन पाटील, पंकज वाघ, राजीव मणियार, उमेश शहा, शितल सोमवंशी, चंद्रकांत कोळी, सपनेश बाहेती, आदित्य माळी, अमोल महाजन, ललित पाटील, अतुल पाटील, नरेंद्र अग्रवाल, भूषण पाटील, निकेत कुमावत, अथर्व मराठे, संदीप यादव, नरेंद्र पाटील, स्वप्नील शेंडे, गणेश बोरसे आदी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल; 'एक मराठा लाख मराठा' आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी

कमिशन हवंय तुम्हाला? आतापर्यंत किती खाल्लं? न्यायमूर्तींनी IAS अधिकाऱ्याला झापलं, वकीलही शांत बसले; पाहा VIDEO

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचं वादळ मुंबईत धडकलं; मनोज जरांगेंची तोफ आझाद मैदानात धडाडणार

Weather Update : गोवा, कोकण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय; मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत 'हवामान'ची स्थिती कशी?

Mahabaleshwar News:'वेण्णा लेकनजीक आढळले अजगर'; भक्ष्याच्या शोधार्थ वावर; वन विभाग, सह्याद्री प्रोटेक्टर्समार्फत रेस्क्यू

SCROLL FOR NEXT