Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : जिल्ह्यात 42 उमेदवारांनी नेले 106 उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २५ उमेदवारांनी ६० अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १७ उमेदवारांनी ४६ याप्रमाणे ४२ उमेदवारांनी १०६ उमेदवारी अर्ज घेतले. मात्र, आजही एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. (Jalgaon Lok Sabha Election 106 nomination papers were taken by 42 candidates in district)

रावेर लोकसभा मतदार संघातून माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासाठी नशिराबादचे हर्षल जैन यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे चार अर्ज, सिंदखेडा (ता.रावेर) येथील प्रवीण समाधान पाटील यांनी उद्योजक श्रीराम पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे चार अर्ज घेतले आहेत.

जळगाव लोकसभा मतदार संघात जळगाव येथील मुकेश महाले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्यासाठी चार अर्ज, श्री. महाले यांनीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अंजली करण पाटील यांच्यासाठी चार अर्ज घेतले आहेत. माजी उपमहापौर कुलभूषण पाटील (उबाठा) यांच्यासाठी अपक्ष म्हणून ४ अर्ज अंकित कासार यांनी घेतले आहेत. डॉ.प्रमोद पाटील (भडगाव) यांनी ‘भाजप’ तर्फे व अपक्ष म्हणून २ अर्ज घेतले आहेत.

जळगाव मतदारसंघासाठी अर्ज घेतलेल्यांची नावे व कंसात गावाचे नाव, अर्जांची संख्या अशी :

रउफ खान कादीर खान (मालेगाव) यांनी आयेशा सिद्धीका रऊफ खान (भारतीय टायगर सेना-२ अर्ज), रउफ खान कादीर खान (भारतीय टायगर सेना, १), रऊफ खान कादीर खान यांनी रहमत बी कादर खान (भारतीय टायगर सेना, १), महेंद्र कोळी (कळमसरा, ता.अमळनेर (प्रबुद्ध रिपब्लिक पार्टी, ३), योगेश बाविस्कर (असोदा), यांनी प्रभाकर गोविंदा सोनवणे यांच्यासाठी (अपक्ष, ४) प्रदीप आव्हाड (जळगाव, अपक्ष ३). (Latest Marathi News)

राजेश हरी सपकाळे (मोहाडी, अपक्ष १), मुकेश तुळशीराम महाले (जळगाव) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील (पारोळा) यांच्यासाठी ४ अर्ज, श्री. महाले यांनी अंजली करण पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासाठी ४ अर्ज, अरुण जगताप (धुळपिंप्री, ता.पारोळा, अपक्ष ४), युवराज बारी (जळगाव, अपक्ष २).

डॉ. प्रमोद हेमराज पाटील (भडगाव, भाजप १, अपक्ष १), निळकंठ प्रकाश पाटील (भातखंडे, ता. पाचोरा, अपक्ष १), श्री.पाटील यांनी वैशाली निळकंठ पाटील (अपक्ष, १), प्रवीण चोधरी (जळगाव, अपक्ष-१, बहुजन विकास आघाडी १), गणेश हिंमत पाटील (तळई, अपक्ष १, वंचित बहुजन आघाडी १), नामदेव पाटील यांनी सुनील दत्तात्रय पवार यांच्यासाठी (अपक्ष, २), राहुल बनसोडे (भुसावळ, बहुजन समाज पार्टी, ४).

आत्माराम सूर्यवंशी यांनी मेघना आत्माराम सूर्यवंशी (अपक्ष, २), डॉ. आशिष सुभाष जाधव (जळगाव, अपक्ष, २), ॲड. वासुदेव धोंडू वारे (कासोदा, अपक्ष २), मुकेश मूलचंद कोळी (शिरसोली,अपक्ष १), विजय दानेज (जळगाव, अपक्ष ४), अंकित मुकुंद कासार जळगाव यांनी माजी उपमहापौर कुलभूषण विरभान पाटील यांच्या (अपक्ष, ४), मांगो पगारे (भडगाव, बहुजन महा पार्टी, २). असे एकूण २५ उमेदवारांनी ६० नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत. असे एकूण उमेदवारांनी २५ उमदेवारी ६० अर्ज घेतले आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघात १७ उमेदवारांनी ४६ अर्ज घेतले.

त्यात संजयकुमार वानखेडे (भुसावळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशल, २), अनंत वसंत बागुल (जळगाव, अपक्ष २), भिकनराव तानकु बाविस्कर (लासुर,चोपडा, अपक्ष ४), प्रवीण समाधान पाटील (रावेर) यांनी उद्योजक श्रीराम दयाराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) यांच्यासाठी ४.

योगेश सुखदेव बाविस्कर (असोदा) यांनी नितीन प्रल्हाद कांडेलकर (मुक्ताईनगर, अपक्ष, ४), रामदास संपतराव कटक (नांदुरा, अपक्ष, ४), कोमल बापूराव पाटील (चहार्डी, अपक्ष १), अशोक इंगळे उचंदा (भूमी मुक्ती मोर्चा, ४), शिवाजी पाटील यांनी शितल समर्थ अंभोरे (अकोला, अपक्ष, २), हर्षल राजेंद्र जैन (नशिराबाद) यांनी माजी आमदार संतोष चौधरी.

(भुसावळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, ४), आत्माराम सूर्यवंशी (अपक्ष, २), राहुल बनसोडे (भुसावळ (बहुजन समाज पार्टी, ३), डॉ. आशिष जाधव (अपक्ष, २), विजय पवार (भुसावळ) यांनी संजय पंडित ब्राह्मणे (भुसावळ, वंचित बहुजन आघाडी, २), बबन कांबळे (भुसावळ) यांनी तृतीय पंथी शमीभा भानुदास पाटील (फैजपूर, वंचित बहुजन आघाडी, २), शेख कुरबान शेख करीम (फैजपूर, एम.आय. एम, ४), युसुफ खान युनूस खान यांनी गयासुद्दीन रसोफुद्दीन काझी (रावेर, अपक्ष) असे एकूण १७ उमेदवारांनी ४६ अर्ज घेतले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT