'QR' boards installed in Municipal Council area. esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election 2024: मतदारयादीत नावाची खात्री आता QR कोडवरून! वोटर हेल्प लाईन ॲपमध्ये नाव नोंदणीची संधी

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने मतदाराच्या सुविधेसाठी नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने मतदाराच्या सुविधेसाठी नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘वोटर हेल्पलाईन ॲप’मधून जिथे असाल तिथून मतदान यादीत नाव समाविष्ट करू शकता. त्याचा फायदा हजारो नागरिकांना होत आहे.

आता मतदार यादीत तुमचे नाव आहे का, हे शोधण्यासाठी ना तलाठी सज्जावर जावे लागेल, ना दुसऱ्या कुठल्या शासकीय कचेरीत. जळगाव जिल्हा प्रशासनाने जागोजागी तुमच्या मतदार यादीत नावाची खात्री करण्यासाठी ‘क्यूआर कोड’ लावले आहेत. (Jalgaon Confirmation of name in voter list now from QR code news)

तुमच्या हातातला अँड्रॉइड मोबाईलमधून गुगल लेन्सला जाऊन कॅमेरा सुरू करून त्याच्यासमोर धरा व थेट निवडणूक आयोगाचे नाव शोधण्याचे पर्याय समोर येतील. तुम्हाला अवघ्या काही सेंकदात तुमचे नाव, मतदान केंद्र सगळे मिळणार आहे. त्यामुळे योग्य वेळ आताच आहे. तुमच्या हातातला मोबाईलचा उपयोग करून मतदान यादीतील नावाची खात्री करून घ्या आणि नाव नोंदविले नसेल, तर ताबडतोब वोटर हेल्प लाईन ॲपमध्ये नाव नोंदवा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.  (latest marathi news)

यासाठी हेल्प डेस्क तयार करण्यात येणार असून, त्यावर महिला कर्मचारी असतील. ‘क्यूआर‘ कोड असलेले बोर्ड ९मेपर्यंत सर्व आठवडे बाजार, सर्व ठिकाणी गर्दी असलेल्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. मतदारांना त्यांचे नाव शोधण्यासाठी फायदा व्हावा, हा बोर्ड लावण्यामागचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

ZIM vs SL 2nd T20I: झिम्बाब्वेने माजी Asia Cup विजेत्या श्रीलंकेचा कचरा केला; ८० धावांवर संपूर्ण संघ गुंडाळला

Ganpati Visarjan 2025 Live Updates : 1935 पासून हरिनामाच्या गजरात निघते सार्वजनिक गणपतीची बैलगाडीतून मिरवणूक

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

SCROLL FOR NEXT