MLA Chimanrao Patil and officials while inspecting the damage caused due to stormy rain. esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : उत्राण परिसरातील फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

Jalgaon Agriculture : पावसामुळे सुमारे आठशे हेक्टरवरील फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, फळ उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : उत्राण (ता. एरंडोल) परिसरात शनिवारी (ता. ८) झालेल्या पावसामुळे सुमारे आठशे हेक्टरवरील फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, फळ उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वादळी पावसामुळे शेकडो घरांचे नुकसान झाल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. आमदार चिमणराव पाटील यांनी उत्राण परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. ( Loss of lakhs of rupees to orchards in Utran area due to stormy rain )

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार पाटील यांनी दिली. लिंबूचे आगार म्हणून ओळख असणाऱ्या उत्राण येथे वादळामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील उत्राण, तळई परिसरात शनिवारी (ता. ८) रात्री नऊच्या सुमारास वादळी पावसामुळे उत्राण परिसरातील ७८७ हेक्टरवरील लिंबू, पेरू, मोसंबी, केळी, चिक्कू फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शेकडो घरांचे पत्रे उडल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. वादळामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्यामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळित झाली होती. सुमारे बाराशे शेतकऱ्यांचे फळबागांचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. (latest marathi news)

वादळामुळे लोणचे बनविणाऱ्या निलॉन्स कंपनीचे शेड उडून गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या फळबागांची आमदार चिमणराव पाटील यांनी पाहणी करून शासनाकडून भरपाई मिळवून देण्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली. नुकसानीची माहिती देताना शेतकरी भावनाविवश झाले आहेत.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, पारोळा येथील नागरिक शिक्षणप्रसारक मंडळाचे चेअरमन मिलिंद मिसर, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन, उत्राणचे सरपंच आनंदा धनगर यांच्यासह कृषी अधिकारी व पर्यवेक्षक, मंडलाधिकारी, तलाठी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT