Mahasanskruti Mahotsav esakal
जळगाव

Jalgaon News : जळगावातील महासंस्कृती महोत्सव 3 मार्चपर्यंत

Jalgaon : राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासना तर्फे जळगावला पोलीस कवायत मैदानावर ‘महासांस्कृतिक महोत्सव’ होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासना तर्फे जळगावला पोलीस कवायत मैदानावर ‘महासांस्कृतिक महोत्सव’ होणार आहे. महोत्सवात स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्यात आले असून राज्यातील विविध कला सादर करणारे कलाकार यांनाही आमंत्रित केले आहे. (Mahasanskruti Mahotsav in Jalgaon till 3rd March)

रोज सायंकाळी पाच पासून रात्री साडे नउ पर्यंत होणाऱ्या या महोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. याच मैदानावर महिलांच्या बचत गटाचे 'मुक्ताई सरस प्रदर्शन' होणार आहे. त्यात महिला बचत गटाकडून तयार केलेल्या वस्तू, खाद्य पदार्थही इथे उपलब्ध आहेत.

असे आहेत कार्यक्रम

महोत्सवात उद्या शुक्रवारी (ता.१) सायंकाळी साडे पाच ते सातपर्यंत गण गवळण, बतावणी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील शाहिरी, सायंकाळी साडे सात ते साडे नउ पर्यंत 'सुरसंस्कृती' हा कार्यक्रम होणार असून त्यात सन्मिता धापटे-शिंदे (सूर नवा ध्यास नवाची विजेती महागायिका) चैतन्य कुलकर्णी (सा, रे, ग, म, प, फेम) यांचा सहभाग असणार आहे.

२ मार्चला सायंकाळी साडे पाच ते सातपर्यंत बहिणाबाईच्या कविता, गीत गायन होईल. तर सायंकाळी साडे सात ते रात्री साडे नउपर्यंत गर्जा सुवर्ण महाराष्ट्र हा महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा स्वरनिनाद कल्चरल फाउंडेशनकृत हा सुप्रसिद्ध कार्यक्रम होणार आहे.

तर ३ मार्चला सायंकाळी साडे पाच ते सात पर्यत ‘अवधेय.. एक आदर्श’ ही नृत्य नाटिका होणार असून सायंकाळी साडे सात ते रात्री साडे नउ पर्यंत 'रायगडाला जेव्हा जाग येते तेंव्हा' हे साहित्य संघ, मुंबई निर्मित व उपेंद्र दाते दिग्दर्शित नाटक बघायला मिळणार आहे.

बसची व्यवस्था

राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून तालुक्यातील नागरिकांसाठी सायंकाळी पाच ते रात्री दहा पर्यंत जळगाव बसस्थानकावरून बस उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT