Jalgaon Market Committee election esakal
जळगाव

Jalgaon Market Committee Election : निकिता सोनवणेंचा अर्ज मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Market Committee Election : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातून निकिता मोतीलाल ऊर्फ मुकेश सोनवणे यांनी शेतकरी असल्याचा दाखला सादर केल्यामुळे जिल्हा निबंधकांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Jalgaon Market Committee Election Nikita Sonavane application approved jalgaon news)

जळगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती व सर्वधारण प्रवर्गातून देऊळवाडे येथील लोकनियुक्त सरपंच निकिता सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

मात्र ५ एप्रिलला छाननीदरम्यान शेतकरी असल्याचा दाखला जोडला नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्याबाबत त्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर बुधवारी (ता. १२) सुनावणी झाली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्या वेळी निकिता सोनवणे यांनी शेतकरी असल्याचा तहसीलदारांचा दाखला सादर केला. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज आवश्‍यक त्या कागदपत्रांसह दाखल केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी, पेपरफुटी प्रकरणानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडवर

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

BSF Martyr Suresh Ambadkar: भारत-बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना कुरखेड्याचा बीएसएफ जवान सुरेश आंबडर हुतात्मा

Pune Metro Safety Nod: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला सुरक्षा मंजुरी; ‘माण–बालेवाडी’ टप्पा सुरू करण्याचा निर्णय आता सरकारच्या कोर्टात

SCROLL FOR NEXT