WhatsApp Pay
WhatsApp Pay esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेची घरपट्टी भरा आता थेट व्हॉटसॲपवरून

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव महापालिकेतर्फे मिळकतधारकांना आता त्यांच्या मालमत्ताकराची बिले थेट व्हॉटसअॅपवर मिळणार आहेत तसेच ते भरताही येणार आहेत. जळगाव महापालिकेतर्फे मिळकतधारकांना व्हॉटस्अपवर मालमत्ताकराची बिले पाठविण्यात येणार आहेत. व्हॉटस्अॅपवर आलेल्या बिलांवर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पे नाऊ (Pay Now) नावाचे बटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. (Jalgaon Municipality News)

त्यावर क्लिक केले की, थेट संबंधित मालमत्ताधारकांचे खाते उघडून त्यांचा कर किती आहे हे दिसेल, त्यानंतर तेथील पे नाऊच्या बटनावर क्लिक करून मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्ताकराचा भरणा करता येणार आहे. असा अनोखा उपक्रम राबविणारी जळगाव महापालिका राज्यात पहिली ठरली आहे.

जळगाव महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या गुगल पे, फोन पे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरून मालमत्ता कर भरता येत होता. त्यानंतर महानगरपालिकेच्या महसुल विभागाने पुन्हा ही पध्दत सोपी करत ‘क्यूआर स्कॅनर’च्या माध्यमातून मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

प्रत्येक मालमत्ताधारकांच्या बिलांवर ‘क्यूआर कोड’ दिला जात होता. त्याद्वारे मालमत्ताधारकांना आपल्या मालमत्तांचा कर भरणे सोपं झालं होतं. या मध्ये आता पुन्हा नवीन सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. (latest marathi news)

पेमेंट गेट वे फिचर

महापालिकेने नागरिकांना कर भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर पेमेंट गेट वे असलेले नवीन फिचर ॲड केले आहे. या नवीन फिचर मुळे महापालिकेकडून नागरिकांना व्हॉटस्अपवर आलेल्या पीडीएफ बिलांवर एक पे नाऊ नावाचे (Pay Now) बटन बिलाच्या खाली उजव्या कोपऱ्याला दिले जाणार आहे.

या बटनावर क्लिक केलं की, संबधित मालमत्ताधारकांचे नाव, मोबाईल नंबर, मालमत्ता क्रमांक, प्रभाग समिती, वॉर्ड नंबर आणि कराची रक्कम दिसणार आहे. रक्कमेच्या पुढे पुन्हा पे नाऊ (Pay Now) नावाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करून मालमत्ताधारकांना कराची रक्कम भरता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा मालमत्ताधारकांच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

SCROLL FOR NEXT