Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Munical News : मनपा आयुक्तपदाबाबत सुनावणी पूर्ण; या तारखेपर्यंत लागणार निकाल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिका आयुक्तपदाच्या पदभाराची सुनावणी सोमवारी (ता. १६) ‘मॅट’मध्ये पूर्ण झाली. मात्र, निकाल राखीव ठेवला असून, येत्या तीन ते चार दिवसांत तो लागण्याची शक्यता आहे.

जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची २९ नोव्हेंबरला शासनाने अचानक बदली केली होती. परभणी येथील महापालिका आयुक्त देवीदास पवार यांची त्या पदावर नियुक्ती केली होती. श्री. पवार यांनी ३० नोव्हेंबरला जळगावला दाखल होऊन पदभार स्वीकारला होता. त्या वेळी बदली झालेल्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड प्रशिक्षणासाठी पुण्यात होत्या.

आपल्या पश्‍चात पदाचा एकतर्फी पदभार स्वीकारल्याबाबत डॉ. विद्या गायकवाड यांनी आपल्या बदलीला आव्हान देणारी याचिका ‘मॅट’मध्ये दाखल केली होती. त्यावर ‘मॅट’ने डॉ. गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती दिली. मात्र, आयुक्तपदाचा पदभार देवीदास पवार यांच्याकडेच ठेवला. कायम पदभार देण्याबाबत सुनावणी सुरू होती.

त्यावर सोमवारपर्यंत मॅटमध्ये एकूण सहा तारखा झाल्या आहेत. सोमवारीही सुनावणी होती. त्यावर निकाल येण्याची अपेक्षा होती. मात्र, दोन्ही गटांची सुनावणी ‘मॅट’मध्ये पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, निकाल राखीव ठेवला असून, येत्या तीन ते चार दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्त देवीदास पवार यांच्याकडे पदभार देण्यात आला असला, तरी त्यांना कामाबाबत ‘मॅट’ न्यायालयाने काही अटी- शर्ती टाकल्या आहेत. त्यामुळे शहरातील इतर कामांवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून आयुक्तपदाचा पदभार ‘मॅट’ कोणाकडे देणार, याकडे लक्ष लागून आहे. आता या निकालाची आणखी तीन ते चार दिवस जळगावकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin योजनेची e-KYC करतांना चुकलात? तर टेन्शन घेऊ नका, सर्वात मोठी अपडेट! 'हे' करा नाहीतर पैसे बंद!

Elon Musk : इलॉन मस्क आणणार इतिहासातील सर्वात मोठा IPO! SpaceX ची व्हॅल्युएशन होणार तब्बल 800 अब्ज डॉलर

Messi Event: मेस्सीच्या कार्यक्रमामुळे कोलकात्यात गोंधळ; पोलिसांची मोठी कारवाई, मुख्य आयोजकाला घेतलं ताब्यात

Ichalkaranji Flood Relief : पूर ओसरला, पण जखमा कायम; इचलकरंजीतील पूरग्रस्त शेतकऱ्यांना १९ लाखांची मदत, १६ लाभार्थी अजून प्रतीक्षेत

Latest Marathi News Live Update: पुण्यात इंदुरीकर महाराज आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाची

SCROLL FOR NEXT