Jalgaon news esakal
जळगाव

जळगाव नागरी पतपेढीचा भूखंड ताब्यात; महापालिकेची धडक कारवाई

जळगाव शहरात महापालिकेतर्फे अनेक सामाजिक संस्थांना भूखंड देण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरात महापालिकेतर्फे अनेक सामाजिक संस्थांना भूखंड देण्यात आले आहेत. मात्र, ज्या कारणासाठी ते देण्यात आले आहेत. त्यासाठी त्याचा वापर होत नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशीच तक्रार आलेला गुलमोहर कॉलनीत एका संस्थेला दिलेला भूंखड महापालिकेने बुधवारी (ता. २७) ताब्यात घेण्याची धडक कारवाई केली. (Latest Marathi News)

जळगाव महापालिकेतर्फे सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, तसेच मंडळाना खुले भूखंड देण्यात आले आहेत. अनेक भागात लेआऊट अतंर्गत खेळ व सामाजिक उपक्रमासाठी हे भूखंड राखीव असतात. पसिरातील नागरिकांनी एकत्रित येऊन संस्था स्थापन केल्यास हा भूखंड त्या भागातील नागरिकांच्या मागणीवरून त्यांना देण्यात येतो. मात्र, गेल्या काही वर्षांपूर्वी महापालिकेतर्फे भूखंड इतर भागातील सामाजिक संस्थानाही देण्यात आले आहेत.

संस्थांतर्फे वापर नाही

शहरात काही संस्थातर्फे ज्या उपयोगासाठी भूखंड देण्यात आले आहेत. त्यासाठी त्याचा वापर करण्यात येत नाही. तसेच त्यांनी ते विकसीत करावयाचे असतात. ज्या संस्था वापर करणार नाही, तसेच विकसित करणार नाहीत, तसेच त्या भागातील नागरिकांच्या तक्रारी आल्यास हे भूखंड परत घेण्यात येतात.

महापालिकेतर्फे प्रथमच कारवाई

जळगाव शहरातील गुलमोहर कॉलनीतील जळगाव नागरी पतपेढीचा हा भूंखड ताब्यात घेण्याची कारवाई अतिक्रमण विभागाने बुधवारी केली. याबाबत महापालिका अभियंता जयंत शिरसाट यांनी माहिती देताना सांगितले, की १९९०-९१ मध्ये महापालिकेतर्फे जळगाव नागरी सहकारी पतपेढीलाच हा भूखंड विकसित करण्यासाठी महापालिकेतर्फे देण्यात आला होता. मात्र, गेल्या ३० वर्षांत मात्र या संस्थेतर्फे हा भूखंड विकसित करण्यात आला नाही. तसेच या परिसरातील नागरिकांच्याही याबाबत तक्रारी होत्या. नगररचना विभागातर्फे त्याची पाहणी करण्यात आली, त्याचे ताब्यात घेण्याबाबत स-कारण आदेश जारी करण्यात आल्याने ते ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आहे.

''महापालिकेतर्फे सामाजिक संस्थांना भूखंड विकसीत करण्यासाठी देण्यात आले आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षात त्या संस्थेने ते विकसीत केलेले नसतील,तसेच परिसरातील नागरिकांच्या त्याबाबत तक्रारी आल्यास चौकशी करून असे भूखंड ताब्यात घेण्यात येतील.'' - डॉ. विद्या गायकवाड, महापालिका आयुक्त, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT