A leopard trapped in a net in a sugarcane field in Shiwar. esakal
जळगाव

Jalgaon News : जाळी लावली डुकरांसाठी, अडकला बिबट्या! भवाळी शिवारातील प्रकार; वन विभागाचे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू

Jalgaon News : बिबट्या जाळीत अडकल्याने या भागातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : भवाळी (ता. चाळीसगाव) शिवारात रानडुकरांपासून पिकांचे संरक्षणासाठी शेताच्या बांधावर लावलेल्या जाळीत रानडुकरांऐवजी चक्क बिबट्या अडकल्याची घटना घडली. बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरापर्यंत त्याला सोडविण्यासाठी ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू केले होते. दरम्यान, बिबट्या जाळीत अडकल्याने या भागातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. (Jalgaon net laid for pigs leopard stuck incident Bhawali Shivara)

भवाळी शिवारात काही दिवसांपासून बिबट्याकडून जनावरांवर हल्ले होत होते. या भागात रानडुकरांची संख्या मोठी असल्याने त्यांची शिकार करण्यासाठी बिबट्या याच भागात वास्तव्यास येतात. रानडुकरांमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले होते.

यासंदर्भात वन विभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा अनुभव यापूर्वी शेतकऱ्यांना आला होता. रानडुकरांपासून संरक्षण व्हावे, म्हणून जामदा (ता. चाळीसगाव) येथील राजेंद्र काकडे यांच्याही भवाळी शिवारातील ऊसाच्या शेतात जाळी लावली आहे. गुरुवारी (ता. ६) दुपारी चारच्या सुमारास जाळीत बिबट्या अडकल्याचे दिसून आले. ही माहिती गावात पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली.

या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना कळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भवाळी गाठले. जाळीत अडकलेला बिबट सुरक्षित असून, त्याचे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू आहे. तेथे गर्दी होऊ नये, यासाठी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, मिलिंद शिंदे व पोलिस कर्मचारी दाखल झाले आहेत. (latest marathi news)

बिबट्या डरकाळ्या फोडत असून, पाय जाळ्यात अडकले असून त्यापासून सुटका करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे, असे वन विभागाचे म्हणणे आहे. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर लक्ष ठेवून आहेत. जळगाव येथून डॉक्टरांना पाचारण करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी सांगितले.

जंगली डुकरांनी केले नुकसान

केळीची सुमारे ६ हजार ७०० टिश्यू कल्चरची रोपे शेतात लावली होती. याच शेतात रानडुकरांच्या कळपाने घुसून पिकाचे मोठे नुकसान केले. या भागात रानडुकरांचा उपद्रव कमालीचा वाढला आहे. विविध उपाययोजना करूनही रानडुकरांचा बंदोबस्त होत नसल्याचे जामदा येथील शेतकरी नितीन पाटील यांनी सांगितले. वन विभागाने यासंदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षाही श्री. पाटील यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT