Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : महापालिकेने घरपट्टी भरण्याच्या दंडाची 'या' तारखेपर्यंत वाढविली

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिका घरपट्टी व पाणीपट्टी ३१ डिसेंबरच्या मुदतीनंतर भरल्यास दंड आकारणी करण्यात येणार होती. मात्र, आता या दंडाची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश आयुक्त देवीदास पवार यांनी काढले आहेत.

हेही वाचा: जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

या आर्थिक वर्षात महापालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी कर भरण्यास १ जानेवारीपासून दंड आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याची मुदत आता वाढविण्यात आली आहे. ३१ जानेवारीपर्यंत कराची रक्कम भरल्यास कोणत्याही दंडाची आकारणी करण्यात येणार नाही. नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपल्या कराच्या रकमा त्वरित भराव्यात, असे अवाहनही आयुक्त पवार यांनी केले आहे.

घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. शनिवारी (ता. ३०) सुटीच्या दिवशी नागरिकांसाठी कराचा भरणार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्यास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. केवळ चार तासांत तब्बल २३ लाख रुपयांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत झाला होता. नागरिकांचा हा प्रतिसाद लक्षात घेऊनच ही सूट वाढविण्यात आली असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रात्री 3 वाजता सशस्त्र दरोडा, प्रतिकार करणाऱ्या पितापुत्रावर चोरट्यांनी चाकूने केले वार, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर....

नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित!

Mumbai: वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडवर नवीन पूल होणार; वीर सावरकर उड्डाणपुलावरून जाणार, कुठे आणि कसा जोडणार?

मी दोघींना विहिरीत ढकललं, तरुणाने गावकऱ्यांना स्वत:च सांगितलं; १५ वर्षीय मुलींचा बुडून मृत्यू, जळगाव हादरलं

T20 World Cup विजेत्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा; भारताविरुद्ध खेळलेला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना

SCROLL FOR NEXT