Farmer esakal
जळगाव

Jalgaon News : वयोवृद्ध पित्याच्या शेतावर फिरवला रोटावेटर; मालमत्तेच्या हिस्यावरुन मुलाचा प्रताप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : हनुमंतखेडे (ता. एरंडोल) येथील रहिवासी तथा नंदुरबार जिल्‍ह्याचे अप्पर जिल्‍हाधिकारी महेश पाटील यांच्या वडिलांनी त्यांच्याविरुद्ध कासोदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वाटे हिस्यासाठी शेतातील उभ्या (गहू-हरबरा) पिकावर रोटावेटर फिरवून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

वडिलांनी दुसरे लग्न केल्याने मुलाने वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळावा, यासाठी न्यायालयात खटला दाखल केला. वाटणीपूर्वी एरंडोल तहसीलदारांकडे सुनावणी झाली. त्यावेळेस भास्कर पाटील यांनी पिकाची काढणी झाल्यावर दोन महिन्यांनी मी वाटणी हिस्सा देण्यास तयार असल्याचे सांगितले.

मात्र, महसूल यंत्रणेने एक दिवस अगोदर दरावर नोटीस चिटकवून भास्कर पाटील उपचारार्थ दाखल असताना, १९ डिसेंबरला प्रशासकीय लवाजमा घेवून उभ्या पिकावर रेाटावेटर फिरवून वाटणी केली. यामुळे भास्कर पाटील यांचे लाखोंचे नुकसान झाले असून, याबबात त्यांनी कासोदा पोलिस ठाण्यात अपर जिल्‍हाधिकारी मुलाविरुद्ध तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: पोलिसांसाठी सुखद वार्ता! ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, कुणाला फायदा होणार?

Shashi Tharoor absence from Rahul Gandhi meeting : राहुल गांधींच्या बैठकीला शशी थरूर सलग तिसऱ्यांदा गैरहजर ; चर्चांना उधाण!

Cabinet Decision: जनगणनेसाठी मोठं बजेट मंजूर; ऊर्जा सुधारणा आणि कृषी क्षेत्रात बदल अन्..., केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Mumbai Viral Video: अरे संसार संसार, पण शौचालयात कसा थाटला? मुंबईत धक्कादायक प्रकार, व्हिडिओ व्हायरल

"माझ्याकडे घरही नव्हतं आणि डॉक्टरांनी.." सोनाली बेंद्रेने सांगितला कॅन्सरचं निदान झाल्यानंतरचा अनुभव

SCROLL FOR NEXT