Municipal commissioner Dr. Vidya Gaikwad came to the municipal corporation on a bicycle
Municipal commissioner Dr. Vidya Gaikwad came to the municipal corporation on a bicycle esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिका आयुक्त आल्या सायकलवर; ‘नो व्हेईकल डे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : शहरातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी महापालिकेतर्फे महिन्याच्या पहिल्या बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ साजरा होतो. त्यानिमित्ताने आज आयुक्त डॉ.विद्या गायकवाड चक्क सायकलने महापालिकेत आल्या.

नो व्हेईकल डेच्या दिवशी सगळ्याच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वाहन वापरु नये असे अपेक्षित असले तरी, हा विषय कुणी फार गांभिर्याने घेत नाही. पण आता स्वतः आयुक्तांनीच हा विषय गंभीरपणे घेतल्याने यापुढील काळात वेळेपासून दंडात्मक कारवाईचा महापालिका प्रशासन विचार करणार असल्याचे सांगण्यात आले. (Jalgaon order to reduce pollution in city Municipal Corporation start No Vehicle Day on first Wednesday of month)

आयुक्तांनी स्वत: सायकलवर येउन पालिकेच्या सगळ्याच प्रशासनाला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. त्यांच्याप्रमाणेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त निर्मला गायकवाड ई व्हेईकलने आले. उपायुक्त अविनाश गांगोडे, सहायक आयुक्त अभिजीत बाविस्कर, मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे, मुख्य लेखा परिक्षक मारोतीराव मुळे हे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून कार्यालयात आले.

अनेकजण अपवाद

अधिकाऱ्यांकडून नो व्हेईकल डे़' चे पालन केले जात असले तरी, कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक कर्मचारी वाहन घेऊनच येतात. (latest marathi news)

महापालिकेच्या प्रवेशव्दारावर कार्यालयात येतात. त्यामुळे उद्देश सफल न होता अडचणच अधिक निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

दंडात्मक कारवाईचा विचार

‘नो व्हेईकल डे’उपक्रमास काही कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात पहिल्या बुधवारी होणाऱ्या उपक्रमात कर्मचारी वाहन महापालिकेच्या आसपास लावून येतात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा विचार प्रशासनातर्फे सुरू आहे. कर्मचारी व नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT