Lok Sabha Election esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : आश्वासनांची खैरात, विकासाचा भुलभुलैय्या! पारोळा तालुका परिपूर्ण होण्याची प्रतीक्षा

Jalgaon News : मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून ‘अब की बार मोदी सरकार’ असा नारा लावत तालुक्याचा विकास होईल असे सांगून मतदारांच्या आशा पल्लवित केल्या.

संजय पाटील

पारोळा : मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून ‘अब की बार मोदी सरकार’ असा नारा लावत तालुक्याचा विकास होईल असे सांगून मतदारांच्या आशा पल्लवित केल्या. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देऊ असे आश्वासित केले. मात्र याबाबत निर्णय न झाल्यामुळे आजदेखील शेतकरी त्या निर्णयापासून वंचित राहिला आहे. वास्तविक पाहता पारोळा तालुका हा राष्ट्रीय महामार्गावर आहे. (Jalgaon Parola taluka only use for voting Even today taluka is devoid of industrial estates)

मात्र अनेकदा या तालुक्याचा वापर फक्त मतदानापुरता करण्यात आला. मात्र आजसुद्धा तालुका औद्योगिक वसाहतीपासून वंचित आहे. मागील लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. मात्र आजही ते पूर्ण न झाल्यामुळे मतदारराजा अपेक्षापूर्तीची वाट बघत आहे. तालुक्यातील अनेक बलून बंधारे पूर्णत्वाची प्रतीक्षा करीत आहेत.

तसेच निधीअभावी तालुक्यातील अनेक विकास कामे राखडली आहेत. विकासकामांचा भुलभुलैय्या दाखवत मतदारांना आश्वासित करून राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न मागील लोकसभा निवडणुकीत करण्यात आला. तालुक्याचा विकास व्हावा, तालुका पाणीदार व्हावा, नदीजोड प्रकल्पाला मूर्त रूप यावे. (latest marathi news)

औद्योगिक वसाहत निर्माण होऊन बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, आरोग्याच्या दृष्टीने तालुका परिपूर्ण व्हावा यासाठी तालुका प्रतीक्षा करीत आहे. परंपरेने दर पाच वर्षाला निवडणुका येतात, जातात व विजय- पराजय होत असतो. मात्र तालुक्याचा यापासून किती फायदा व किती तोटा होतो हा विषय चिंतनाचा बनला आहे.

अविकसित तालुक्याला विकसित करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ होणे काळाची गरज आहे.मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा पराभव होऊन भाजपाचे उन्मेश पाटील विजयी झाले होते.

आता भाजपाविरुद्ध महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी लढत असून या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार व तालुका कोणाच्या पदरात जास्तीत जास्त मतदानरुपी दान टाकणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT