private travells
private travells sakal
जळगाव

खासगी ट्रॅव्हल्सचे पुणे, मुंबईचे दर दोन हजारांवर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दिवाळीच्या दिवसांत एसटी, रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीण झाल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी सुरू होते आणि विशेषत: पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या- येणाऱ्या प्रवाशांची सर्रास लूट चालते. सध्या या दोन्ही ठिकाणांसाठीचे खासगी ट्रॅव्हल्सचे दर दोन हजारांवर पोचले असून त्यावर परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

दिवाळीसह अन्य सणासुदीच्या दिवसांत रेल्वेचे आरक्षण फुल असते. त्यामुळे दर वर्षीच या दिवसांत खासगी ट्रॅव्हल्सचालक अवाजवी दर आकारून प्रवाशांची लूट करतात. दीड वर्षापासून कोरोनामुळे आधीच

रेल्वेगाड्यांची संख्या मर्यादित आहे, त्यात पॅसेंजर गाड्या अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्यांमध्ये प्रवाशांना सामावून घेणे केवळ अशक्य आहे. मात्र, दिवाळीसारख्या सणाला घरी प्रवास करणे आवश्‍यक असल्याने हीच गरज लक्षात घेऊन खासगी ट्रॅव्हल्सचालकांची मनमानी सुरू झाली आहे.

कोरोनामुळे ‘ब्रेक’

दीड वर्षापासून कोरोनामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या या मनमानीला ‘ब्रेक’ लागला होता. कारण, प्रवाशांची संख्याच मोठ्या प्रमाणात रोडावली होती. या दीड वर्षातील बहुतांश काळ खासगी ट्रॅव्हल्स अक्षरश: थांबून होत्या. या दिवसांत ट्रॅव्हल्सचालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. मात्र, दोन आठवड्यांपासून खासगी ट्रॅव्हल्स पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या असून त्यामधील गर्दी वाढ्याने दर गगनाला भिडले आहेत.

परिवहन विभागाचे दुर्लक्ष

मनमानी पद्धतीने हा कारभार सुरू असला तरी परिवहन विभागाचे त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. परिवहन विभागाचे अधिकारी ‘तक्रार आली तर कारवाई करू...’ या भूमिकेत असून अशा प्रकारांत तक्रारच समोर येत नाही. त्यामुळे परिवहन विभागाचे फावते. हा प्रकार सर्रास सुरू असताना परिवहन विभाग तपासणी, चौकशीची तसदीही घेत नाही. प्रवाशांची लूट मात्र अशीच सुरू राहते.

तिप्पट, चौपट दर

सध्या पुणे, मुंबईहून येणाऱ्या या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. कारण, या दोन्ही गावांमध्ये खानदेशातील हजारो तरुण स्थायिक झाले असून, दिवाळीला ते घरी येत असतात. रेल्वेगाड्यांतील आरक्षण फुल असल्याने खासगी ट्रॅव्हल्समधून ते प्रवास करत असून, ट्रॅव्हल्सचालकानी हे दर तिप्पट, चौपटीने वाढविले आहेत. एरवी पुण्यासाठी ६०० ते ७०० रुपयांत प्रवास होत असला तरी सध्या हाच दर दोन हजारांवर पोचला आहे. वेगवेगळ्या ट्रॅव्हल्सचे वेगवेगळे दर असले तरी साधारणत: १४०० ते २२०० पर्यंत जादा भाडे आकारले जात आहे. मुंबईसाठीही एरवी ४००-५०० प्रतिप्रवासी दर आकारला जातो. सध्या हाच दर १५०० ते २५०० पर्यंत गेला आहे.

खासगी ट्रॅव्हल्सचे दर

ठिकाण एरवीचे दर सध्याचे दर

मुंबई (स्लीपर) ५००-७०० १८००--२५००

मुंबई (सीटर) ४००-६०० १२००-१८००

पुणे (स्लीपर) ६००-८०० १३००-२०००

पुणे (सीटर) ५००- ६५० १०००-१७००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT