Ramdev Wadi Accident & Pune Porshe Accident esakal
जळगाव

Ramdev Wadi Accident Case : कायद्याच्या चिंध्या अन्‌ सुव्यवस्थेचे धिंडवडे..!

Jalgaon News : ७ मेस रेसिंगच्या नादात बड्या बापांच्या मस्तवाल तरुणांनी रामदेववाडीजवळ दोन चिमुकले, त्यांची आई व महिलेचा भाचा, अशा चौघांना सुसाट कारखाली चिरडून त्यांचा बळी घेतला.

सकाळ वृत्तसेवा

रामदेववाडी अपघात प्रकरणात पोलिसांच्या एकूणच तपासावर संशय व्यक्त होऊन पोलिस दलाची अब्रू निघत असताना, जळगावातील तरुणाच्या निर्घृण हत्येपाठोपाठ भुसावळात माजी नगरसेवकासह मित्राचे दुहेरी हत्याकांड, जळगावातील सराफाकडे पडलेला सशस्त्र दरोडा आणि त्याची धग शांत होत नाही, तोच वृद्ध व्यावसायिकाच्या निवासस्थानी नोकरानेच दरोडा टाकून केलेला घात या घटनांची मालिका जळगाव जिल्ह्यात दहशत माजविणारी आहे. गंभीर गुन्ह्यांची ही मालिका कायद्याच्या चिंध्या, सुव्यवस्थेचे धिंडवडे उडविणारीच नव्हे, तर पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे. (Jalgaon Ramdev Wadi Accident Case)

७ मेस रेसिंगच्या नादात बड्या बापांच्या मस्तवाल तरुणांनी रामदेववाडीजवळ दोन चिमुकले, त्यांची आई व महिलेचा भाचा, अशा चौघांना सुसाट कारखाली चिरडून त्यांचा बळी घेतला. पुण्यात तरुण अभियंत्यांना पोर्शे कारने उडविल्यानंतर त्या घटनेचे देशभरात पडसाद उमटले असले, तरी रामदेववाडीची घटना राज्य स्तरावरची बातमीही बनली नाही.

माध्यमांनी व जनभावनांच्या तीव्रतेने या घटनेला व त्यानंतरच्या तपास प्रक्रियेला पुढे आणले. अशात पोलिसांनी हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळल्याने त्यातील संशय वाढला. पोलिसांवरील दबाव सरळसरळ दिसून आला आणि प्रकरण हाताबाहेर गेले. तीव्र जनभावनांमुळे कदाचित या प्रकरणाचा तपास ‘रूळावर’ आला असला, तरी तोपर्यंत या प्रकरणाने पोलिसांची अब्रू घेऊन वेशीवर टांगून दिली होती.

या प्रकरणामुळे जनभावना तीव्र असतानाच, कालिंकामाता मंदिराजवळील हॉटेल भानूमध्ये किशोर सोनवणे या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून झाला. केवळ समाजात दहशत निर्माण व्हावी, या एकमेव उद्देशाने मारेकऱ्यांनी अत्यंत क्रूरतेने केलेली ही हत्या अंगावर काटे आणणारी ठरली. सीसीटीव्हीत कैद झालेली त्याची दृष्ये भयानकच होती.

याच दरम्यान सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरात सौरभ ज्वेलर्सवर सुरक्षारक्षकांवर हल्ला करून दरोडेखोरांनी लाखांचे दागिने व रोकड चोरून नेली. अर्थात, या मोठ्या दरोड्याशिवायही शहरातील विविध भागांत चोऱ्या, घरफोड्यांचे प्रकार सुरूच आहेत. काल-परवा व्यावसायिक राजा मयूर यांच्या निवासस्थानी वृद्ध मयूर दांपत्याला धमकावून नोकरानेच त्याच्या साथीदारांच्या मदतीने मोठा ऐवज चोरून नेला. (latest marathi news)

गुन्हेगारीसाठी कुख्यात भुसावळ शहरातील गँगवॉर थांबायचे नाव घेताना दिसत नाही. माजी नगरसेवक संतोष बारसे व त्याच्या मित्राला कारमध्येच गोळ्यांचे फैरी झाडत संपविले. पूर्ववैमनस्य केवळ मारहाण करून कमी होत नाही, तर त्यासाठी दुसऱ्याला संपवलेच पाहिजे, या उद्देशातून झालेले हे दुहेरी हत्याकांड थरकाप उडविणारेच आहे. विशेष म्हणजे मारेकऱ्यांनी हत्येनंतर हवेतही गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

शहर, गावांत गुन्हेगार असताना, पोलिस प्रत्येक नागरिकाच्या मागे एक कर्मचारी देऊ शकत नाही, तसे अपेक्षितही नाही. मात्र, पोलिस नावाच्या यंत्रणेचा, खाकी वर्दीचा काही वचक असायला हवा की नको, हा प्रश्‍न आहे. कायद्याचा धाक कुणी बाळगायचा नाही का? चोऱ्या, दरोड्यांसह आता खुनांच्या घटनांनी जळगाव जिल्हा हादरतोय. मग, पोलिस दलाचे अस्तित्व आहे का जिल्ह्यात?

पोलिसांनी कितीही कार्यक्षमता दर्शवली, तरी गुन्हेगारी समूळ नष्ट होईल, असे अजिबात नाही. मात्र, गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, जिल्ह्यात पोलिस आहे आणि त्यांचा धाक बाळगायलाच हवा. कुणी, केव्हाही, काहीही गुन्हा करेल, असे चालणार नाही.

किमान असा मेसेज गुन्हेगारी जगतात व समाजातही जायला हवा. पुण्यातील ‘हिट ॲन्ड रन’ प्रकरणात संवेदनशीलतेने सक्रिय झालेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्यातील या गुन्हेगारीबाबत सक्रिय होतील, अशी अपेक्षा करूया.

‘आईये ना... हमरा जलगांवमें...’

गुन्ह्यांची ही मालिका पाहता काही वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘खाकी’ या वेबसिरीजची व त्यातील ‘आईये ना हमरा बिहारमें’ या टायटल सॉंगची आठवण होऊन त्याऐवजी ‘आईये ना हमरा जलगांवमें...’, असा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: सुंच आठ वर्षांपासून चालवत होता किडनी विक्रीचे रॅकेट; एका किडनीमागे सव्वा कोटी, मुलीच्या वडिलांनीही दिला होता नकार!

Viral Video : रोहित भाऊ, वडापाव खाणार का? प्रेक्षकांमधून मिळाली आवडत्या पदार्थाची ऑफर; भारी होती हिटमॅनची रिअ‍ॅक्शन

Shukra Gochar 2026: वर्षाच्या पहिल्याच गोचरमध्ये ‘या’ राशींचं नशीब फुलणार, करिअरला मिळणार मोठी उंची

Vijay Hazare Trophy : पहिल्याच दिवशी २२ शतकं, गोलंदाजांची धुलाई; फलंदाजांनी मोडले अनेक विक्रम

पहिल्याच सामन्यात शतक, आता विराट कोहली, रोहित शर्मा यांचा Vijay Hazare Trophy मधील पुढील सामना कधी? वाचा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT