Certodactus Varadgiri esakal
जळगाव

Jalgaon News : नाचनखेडा शिवारात आढळली दुर्मिळ पालीची प्रजाती; ‘सरटोडॅक्टस वरदगिरी’ची झूलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया संस्थेत नोंद

Jalgaon News : पर्यावरणाच्या अन्न साखळीत महत्त्वाचा घटक असलेली ‘सरटोडॅक्टस वरदगिरी’ ज्यास ‘बेंड टो जिगोस’ किंवा ‘फॉरेस्ट ग्रे जिकोस’ असेही म्हणतात.

सकाळ वृत्तसेवा

तोंडापूर (ता. जामनेर) : पर्यावरण संवर्धन व संशोधन क्षेत्रात कार्य करणारे सिल्लोड येथील डॉ. संतोष पाटील यांना आपल्या मूळ गावी भावकितील दीपक रायबा चौधरी पाटील यांच्या शेतात नुकतीच दुर्मिळ पालीची प्रजाती आढळून आली. पर्यावरणाच्या अन्न साखळीत महत्त्वाचा घटक असलेली ‘सरटोडॅक्टस वरदगिरी’ ज्यास ‘बेंड टो जिगोस’ किंवा ‘फॉरेस्ट ग्रे जिकोस’ असेही म्हणतात. (Jalgaon Rare lizard species found in Nachankheda Shiwar)

जमिनीवर पडलेल्या वाळलेल्या पाला पाचोळ्यात निपचित पडलेली ही पाल त्यांच्या निदर्शनास आली. या प्रजातीचा रंग मातकट व मातीशी साधर्म्य राखणारा असल्याने नैसर्गिक शत्रूस व भक्षास ती सहज दिसत नाही. यास ‘कॅमोफ्लागिंग’ संबोधले जाते व ही शितरक्ताची प्रजाती खानदेशच्या उष्ण भागात तग धरून आहे, ही गोष्ट जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

ही पाल मातीच्या भेगात, पाला पाचोळा या खाली अधिवासास प्राधान्य देते व बहुधा निशाचर असतात, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. या आधीही भोकरदनजवळील आव्हाणा शिवारात ‘जिकोनेला डेक्कनसिस’ नावाच्या पालीच्या प्रजातींची नोंद केली आहे. दोन्ही प्रजातींची केंद्र सरकारच्या जैवविविधता संबंधित झेडएसआय या संस्थेत नोंद करण्यात आली आहे.

"ही प्रजाती स्क्वॅमाटा गणातील व गेकोनिडा या फॅमिलीतील असून, शीत रक्ताची म्हणजे त्यांच्या शरीरातील तापमान वातावरणातील तपमानानुसार बदलते. वेगळा जीव दिसल्यावर त्यास मारण्याची मानवी प्रवृत्ती असते. असे न करता जैवविविधतेमधील दुर्मिळ असलेले हे सजीव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे."- डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान

(latest marathi news)

काय आहे या दुर्मिळ प्रजाती

पाठीवर मोठे गोलाकार तपकिरी काळ्या ठिपक्यांच्या सहा जोड्या, पोट व पाठ जेथे जोडले जाते. त्यावर ठिपक्यांची ओळ, लांबी नऊ ते बारा सेमी, शेपटी लांब, डोके हे मानेपासून वेगळे उठून दिसणारे (डिसटिंक्ट हेड), पायाचे बोट जास्त पसरट व पंजा खाली वाकलेला (म्हणून बेंड टो) रंग हलका तपकिरी राखाडी व त्यावर काळसर तपकिरी ठिपके, डोळे मोठे. शेतीचे नुकसान करणाऱ्या गोगलगायचे लहान पिल्लं, मुंग्या, कीटक, तुडतुडे हे मुख्य खाद्य आहे. ही दुर्मिळ प्रजाती फारच तुरळक ठिकाणी पाहावयास मिळते. त्यामुळे त्याची नोंद ‘झेडएसआय’मध्ये झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT