Banana Crop esakal
जळगाव

Raver Lok Sabha Constituency : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबितच; रावेर तालुक्यातील स्थिती

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये झालेली पंचवार्षिक निवडणूक ही केळीसह मेगा रिचार्ज, उड्डाणपूल, टेक्स्टाईल पार्क आणि राष्ट्रीय महामार्ग या प्रश्नांभोवती फिरली होती.

दिलीप वैद्य

रावेर : रावेर लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये झालेली पंचवार्षिक निवडणूक ही केळीसह मेगा रिचार्ज, उड्डाणपूल, टेक्स्टाईल पार्क आणि राष्ट्रीय महामार्ग या प्रश्नांभोवती फिरली होती. यातील एखाद- दुसऱ्या कामाचा अपवाद वगळता बहुसंख्य कामे अजूनही मार्गी लागलेली नाहीत. २०१९ मध्ये झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे व काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली होती. (Raver Lok Sabha Constituency)

वंचित बहुजन आघाडीचे नितीन कांडेलकर हे ही या निवडणुकीत प्रमुख उमेदवार होते. यावेळी बोलताना खासदार रक्षा खडसे यांनी बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गाचा डीपीआर झाला आहे असे सांगितले होते. प्रत्यक्षात या रस्त्याचा डीपीआर अगदी अलिकडे सुमारे चार महिन्यांपूर्वी झाला.

मात्र हा रस्ता रावेर शहराजवळून व रावेर तालुक्याच्या पूर्व भागातून नेण्याऐवजी केंद्र सरकारच्या राजपत्रात तो मुक्ताईनगर तालुक्यातून नेण्याचे नियोजन असल्याने रावेरसह अंतुर्ली भागातही शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे.

जामनेरात टेक्सटाईल पार्क उभारण्याची घोषणा तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र त्यासंदर्भात अजून काही हालचाल दिसून येत नाही. मेगा रिचार्ज या योजनेचे भूमिपूजन लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते करू, अशी घोषणाही करण्यात आली. परंतु, त्याचाही मुहूर्त अद्याप लागलेला नाही. (Latest Marathi News)

दोन पुलांचा प्रश्‍न कायम

मागील लोकसभा निवडणुकीत उड्डाणपुलांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार खडसे यांनी दिले होते. निंभोरा येथील उड्डाणपूल पूर्ण झाला. मात्र, रावेर तालुक्यातील सावदा आणि रावेर या दोन्ही रेल्वे स्थानकांजवळील उड्डाणपुलांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. सावदा येथील उड्डाणपुलाचे काम बंद पडले असून रावेर येथील पुलाचे कामही अपूर्ण अवस्थेत आहे.

केळी या पिकाला फळाचा दर्जा देण्याबाबत लोकप्रतिनिधींनी अनेकदा घोषणा केल्या मात्र नुसते कागदोपत्री दर्जा देऊन उपयोग नाही तर आंबा, द्राक्ष, संत्री, मोसंबी या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीनंतर त्यांना ज्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळते ती केळीला मिळवून देण्याचे आश्वासन देऊनही लोकप्रतिनिधी कमी पडले असेच म्हणावे लागेल.

केंद्र सरकारच्या युवक, महिला दिव्यांग यांच्यासाठीच्या विविध योजना तालुक्यात यशस्वीपणे राबविल्या गेल्या, मात्र तालुक्यात प्रकल्प उभारून युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात अपयश आल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi and Emmanuel Macron: भारताचा दबदबा जागतिक पातळीवर कायम! आता मोदींची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशीही चर्चा

भक्ती, उत्साह आणि विरहाचा संगम! मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पुणेकरांच्या डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘गणपती बाप्पा मोरया’

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पावसाच्या सरी असूनही मुंबईत लाखो लोक विसर्जन मिरवणुकीत सामील

Ganesh Festival 2025 : केज पोलिसांची डीजे विरोधात कारवाई; गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पारंपारिक वाद्यांचा आग्रह

"आठ महिने तिने आम्हाला भेटणं टाळलं" प्रिया मराठेच्या अखेरच्या दिवसांबद्दल मैत्रीण झाली व्यक्त; म्हणाली..

SCROLL FOR NEXT